Marathi letter new format?
Answers
Format of marathi letter is as follows-
पत्र लेखनाचे स्वरूप
१. सर्वात आधी स्वतःचे नाव, पत्ता आणि तारीख लिहावी.
२. जर औपचारिक पत्र असेल तर प्राप्तकर्त्याचा पत्ता लिहावा. अनौपचारिक पत्र असेल तर प्राप्तकर्त्याचा पत्ता लिहिला जात नाही.
३. औपचारिक पत्र असेल तर विषय लिहिला जातो. अनौपचारिक पत्र असेल तर विषय लिहिला जात नाही.
४. प्राप्तकर्त्याला वंदना दिली जाते
५.पत्राचे कारण लिहावे.
६. पत्राच्या शेवटी तुमचे नाव लिहावे.
उदा-
अ. ब. क.
विंग A
समता विद्यालय हॉस्टेल,
एस. बी रोड,
नाशिक-३२
प्रिया बाबा,
मी मजेत आहे, आणि अशा आहे की घरी सुद्धा सगळे कुशल असतील. माझा अभ्यास छान चालू आहे. गेल्या आठवड्यात चित्रकला स्पर्धेत मी पहिला आलो.
हे पत्र लिहिण्यास कारण कि आमची शाळा दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी शुद्ध सहल नेणार आहे. सहल रायगड किल्ल्यावर जाणार आहे. त्या साठी आम्हाला ₹१००० भरावयाचे आहेत. त्याच बरोबर एक फॉर्म सुद्धा भरायचा आहे. मी पत्रा सोबत फॉर्म पाठवत आहे. तुम्ही सही करून तो पैशांसोबत परत पाठवा.
आईला माझा नमस्कार सांगा. मी सहल झाल्यानंतर घरी येऊन जाईन.
तुमचा लाडका मुलगा,
अ. ब. क.