Marathi :-
निबंध लेखन :- पुस्तकाची आत्मकथा
Answers
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
काल माळयावरची साफसफाई करतांना हुमसुन हुमसुन रडण्याचा एक नवीनच आवाज कानी पडला, मी जरा घाबरलोच ..... पण पुढुन सौम्य आवाज आला,‘‘मित्रा घाबरु नकोस! मी तुझाच एक आवडता जुना मित्र’’, हे ऐकुण मी चकितच झालो. काय करावे काही सुचेना, क्षणभर शांतता होती. आजुबाजुला बघितलं कुणीच कसं नाही? तेवढयात जीर्ण पिश्वीच्या कोपÚयातून काहीतरी हलतांना दिसलं व पुढे परत आवाज आला, मित्रा अजुनही मला ओळखल नाहीस? वडीलांच्या मागे रडुन-हट्ट करुन तु मला घरी आणलस, तुझ्या खोलीत मला जागा दिलीस, मला जीवापाड जपलस, पण जेव्हा तुझं काम झाल तेव्हा तु मला काही वार्षांआधी इथे अडगळीत आणुन ठेवलंस. इथे माझे खुप हाल झाले, उंदरांनी मला त्यांच जेवण बनविलं, उधळींनी लपण्यासाठी जागा केली व आईने तर खुप सर्व जुन सामान माझ्या अंगावर आणून टाकले. माझे खुप हाल झालेत. माझे पानं फाटलीत, मुखपृष्ठ फाटले, खुप दुःख झालं मला.
तुला तर माहीत असलेच, ‘‘पुस्तक हेच आपले चांगले मित्र.’’ असं म्हणतात ना, आपले काम झाल्यावर मला दुसÚया मित्रांच्या घरी पाठव त्यांनाही पुस्तकांविषयी प्रेम निर्माण होईल किंवा गावातल्या ग्रंथालयामध्ये दे. पुष्कळ लोक मला आवडीने त्यांच्या घरी नेतील. बस मित्रा अजुन काय हवे.