India Languages, asked by rachelparmar1, 5 hours ago

Marathi
निसर्ग माझा गुरु
I want speech
15 lines
not 3 or 4 line
I want 15 lines

Attachments:

Answers

Answered by mahendraselukar
1

Answer:

सृजनकर्त्याने पहिल्यांदा निसर्ग बनवला; वातावरण, पाणी, जीवाणू , झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी आणि मग मानवाचा जन्म आणि विकास झाला. या निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व असूच शकत नाही, आणि हे विधान विज्ञान सुद्धा मानते. आपल्या आकाशगंगेमध्ये लाखो तारे, ग्रह आहेत काही पृथ्वीपेक्षा मोठे तर काही छोटे. पण आपल्या निरीक्षण योग्य अवकाशात मात्र एकाच ठिकाणी जीवन सापडते ती जागा म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवरच्या जीवनाचा आरंभ कसा झाला? का झाला? कशामुळे झाला? असे पृथ्वीवर काय वेगळे आहे की या ताऱ्यांच्या, ग्रहांच्या गर्दीमध्ये फक्त इथेच जीवन दिसते, फुलते आणि बहरते.

पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग. या वातावरणाशीवाय, निसर्गाशिवाय कुठल्याही ग्रहावरती जीवन बहरू शकत नाही. या सौरमंडलात आपण अशा अमूल्य ठिकाणी राहत आहोत, आपलं पूर्ण अस्तित्वच या निसर्गाने मांडले आहे. जेव्हा एखादा नवीन ग्रह बनतो तो लाव्ह्याचा एक जळता गोळा मात्र असतो, हा गोळा अवकाशात लाखो वर्ष फिरत राहतो. तो हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते पण या प्रक्रियेत सुद्धा लाखो वर्षं निघून जातात.

अशा लाखो वर्षांच्या मेहनतीनंतर ग्रह जेव्हा पुरेसा थंड होतो तेव्हा जीवनचक्राचे पहिले पाऊल ग्रहावरती पडते, ते म्हणजे वातावरण बनण्याची सुरुवात. कुठलही ग्रहावरती वातावरण बनण्यासाठी कार्बोन डाय ऑक्साइड सारख्या ग्रीन हाऊस वायूंची गरज असते. तिथल्या जमिनीवरच्या रासायनिक प्रक्रियेतून, ज्वालामुखी मधुन हे ग्रीनहाउस वायू बाहेर पडतात आणि हळूहळू वातावरण बनायला मदत करतात.

Similar questions