Marathi Nibandh ghadyal naste tar
मराठी निबंध घड्याळ नसते तर
Answers
मराठी निबंध घड्याळ नसते तर :
घड्याळ नसते तर ही कल्पनाच किती भयंकर आहे. असे झाले तर सगळ्यांचे वेळेचे नियोजन चुकेल. तसेच वेळेचे महत्व कळणाळच नाही. अगदी सकाळ उठल्यापासुनच ते रात्री झोपेपर्यंत सगळेकाही चुकेल. घड्याळ नसेल तर सगळ्या लोकांमध्ये शिस्त आणि नियमावली राहणार नाही. रेल्वे, एस.टी, विमान याची ठराविक वेळ नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल. घड्याळ नसते तर ते लोक जसे पुर्वी खुप शांत जीवन जगत होते तसे आपण पण जगत असतो. धावपळ नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, उशीर झाला तरी चालेल. माणुस विज्ञान शिकला आणि खुप प्रगती केली पण या सुखाच्या मागे धावतांना तो घड्याळाच गुलाम झाला आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. पण या धावत्या आयुष्यात किती मनस्ताप होतोय . त्यामुळे आरोग्य बिघडते. जेव्हा मानवाच्या आयुष्यात घड्याळ ही वस्तू नव्हती तेव्हा सुध्दा लोक सूर्य, चंद्र,तारे, नक्षत्र या वरुन वेळ मोजत असे. तेव्हा सुध्दा तो सुखी होता. पशूपक्षी यांचे ही काही अडत नाही घड्याळा वाचून. घड्याळ हे मानवी जीवनाला इतर प्राण्यापेक्षा वेगळे बनवते. घड्याळ वेळेचे भान ठेवून वागायला शिकवते. घड्याळ हे मानवाला आवश्यक आहे. पण घड्याळ नसले तर सगळ्यांना त्रास होईल पण आयुष्य थांबणार नाही.
Answer: