Marathi nibandh me mobile boltoy
Answers
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय...मोबाईल फोन हे त्यापैकीच एक...आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे....मोबाईलमुळं जग जवळ आलं आहे. पण मानव संस्कृतीच्या इतिहासात डोकावल्यास माणसाने संवादासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केल्याच लक्षात येईल.
मानव संस्कृतीच्या उदयाला ५० हजार वर्ष उलटून गेली आहेत... सुरुवातीच्या काळात संवादासाठी मानवाने विविध प्रकारच्या आवाजाचा वापर केला...कालांतराने भाषा अस्तित्वात आली...संवादासाठी भाषेचा वापर सुरु झाला...मानवाने माध्यम म्हणून प्राणी आणि पक्षांचा वापर केला.पुढं दूत अस्तित्वात आला आणि आधुनिक काळात त्याला पोस्टमन ही ओळख मिळाली..
पहिल्या विश्वयुद्धात संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला. तर दुस-या विश्वयुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला...त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता..१९४०च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली...
पुढची तीन दशकं यावर बरचं संशोधन झालं..आणि ग्राफिक्स इन -३ एप्रिल १९७३ ग्राफिक्स आऊट- ला पहिला मोबाईल फोन कॉल झाला.. मोटोरोला कंपनीचे इंजीनिअर मार्टिन कुपर यांनी तो कॉल केला होता...तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता...
आज त्या घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झालीत...सुरुवातील केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल फोन आज स्मार्ट फोन बनला असून इंटरनेटपासून ते फोटपर्यंत आणि व्हिडिओ कॉलिंग पासून ते मनोरंजनापर्यंत सगळं काही एकट्या मोबाईलमध्ये सामावलं आहे...त्यामुळेच मोबाईल फोन माणसाचा जीवलग बनला आहे..
मोबाईल फोन आज प्रत्येकाची गरज बनला आहे...कारण मोबाईलमुळे कोणत्याही व्यक्तीशी...कधीही आणि कुठेही तुम्ही सहज संपर्क करु शकता....त्यामुळे संवादाचं हे साधन जगभर लोकप्रिय ठरलं आहे...गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन पहायला मिळतो...सुरुवातीच्या काळात केवळ संवादाचं माध्यम म्हणून मोबाईल फोनचा वापर केला गेला...
बदलत्या काळाबरोबर मोबाईल फोनही बदलला आणि आता तो स्मार्ट बनला आहे...संवाद साधण्याबरोबच इंटरनेट, फोटो,जीपीआरएस,व्हीडिओ कॉलिंग,मनोरंजन असं सगळं काही मोबाईल फोनमध्ये सामावलं आहे.
स्मार्ट फोनमध्ये आज अनेक एप्लिकेशन्स उपलब्ध असून कॉम्प्यूटरपेक्षाही जास्त एप्लिकेशन्स हे स्मार्ट फोनसाठी तयार केले जात आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य,कला,तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रासाठी मोबाईल फोनला महत्वाची भूमिका बजावणार आहे. मोबाईल फोनमुळे आवघं जग मुठीत आलं असून भविष्यात मानवाच्या विकासात त्याचं महत्व आणखी वाढणार आहे..
Answer:
नमस्कार मित्रांनो,मी तुमचा मित्र मोबाइल बोलत आहे.तुम्ही तासन्तास माझा वापर करत असता.म्हणून विचार केला की तुमच्याशी आज बोलावे.
सकाळी माझ्याच अलार्म ने तुमच्यामधील बरेच लोक उठतात.माझ्यामुळे तुम्ही जगातील बहुतांश लोकांशी संपर्क साधू शकता.माझ्यामुळे तुम्हाला तुमचे ऑफिसचे काम घरबसल्या करता येते.व्हिडिओ कॉलमुळे तुमच्यापासून लांब राहत असलेल्या लोकांना तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येते.
मी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रम,खेळांचे थेट प्रसारण दाखवतो.सिनेमा,नृत्य दाखवतो.गाणी ऐकवतो.तुमचे छान छान फोटो काढतो. तुमच्या अभ्यासात मदत करतो.
माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो.पण तुम्ही सतत माझा वापर करता ही गोष्ट मला आवडत नाही.तुम्ही अभ्यास करत नाही, बाहेर जाऊन खेळत नाही.माझ्यातले गेम्स सतत खेळत राहतात.याचा दोष मला मिळतो.
माझा जास्त वापर केल्याने तुमची डोळ्यांची दृष्टी खराब होऊ शकते व तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.तेव्हा तुम्ही माझा अतिवापर टाळा.तुमच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा,त्यांच्यबरोबर खेळा,अभ्यास करा.मग तुम्ही माझा वापर करा. मी नेहमीच तुमची मदत व मनोरंजन करीन.
Explanation: