India Languages, asked by babligupta3075, 11 months ago

marathi nibandh me phayali jatra

Answers

Answered by kvsratnakar
1

Answer:

i don't know Marathi !!!!!

Answered by sammy6596
7

Explanation:

माझ्या गावात भैरवी या ग्रामदेवतेचे देऊळ आहे. या आमच्या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी पौर्णिमेला भरते. भैरवी देवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावातील सामुदायिक सोहळा असतो. चैत्राली तुमच्या मागे पुढे पाच-दहा दिवस देवळाचा परिसर नुसता पासून गेलेला असतो.

यंदाच्या चैत्र पुनवेला गावच्या जत्रेला जायची संधी मला मिळाली. मी खूप झालं चैत्र पूर्वेच्या चार दिवस आधीच मी गावात जाऊन थडकलो. गावात सगळीकडे आधीपासूनच उत्सवाचे वातावरण होते. नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेले माणसे जत्रेसाठी आवर्जून आली होती. त्यामुळे घरी माणसांची वर्दळ होती.

अखेर चित्र पूर्वीचा दिवस उजाडला. पहाटे दूरूनच सनईचे मंगल सूर कानी येत होते. त्यात नगराचा मंद ठेका घुमत होता. मंजुळ घंटा नाद वातावरणात गुंजत होता. वाऱ्याला अंबानीचा दूरवर सुटला होता ! सारे वातावरण मंगलमय झाले होते. अशा पवित्र वातावरणात मी व माझा आतेभाऊ जत्रेमध्ये फेरफटका मारायला निघालो.

रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दीप माळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरला होता. गावातील युवकांनी देवालय आणि त्याचा परिसर रंगबिरंगी फुले फुलांनी व पताकांनी आणि माळ यांनी सुशोभित केला होता. दिवस जसा जसा पुढे सरकू लागला, कशी कशी जत्रा चौरंग आणि उत्साहाने फुलत गेली.

देवळाच्या परिसरात विविध दुकानाच्या राहुट्या पडल्या होत्या. देवीच्या ओटी साठी खण, नारळ, फुले, हळद-कुंकू विकणारी दुकाने व प्रसादाची विविध पदार्थ असणारी मिठाई ची दुकाने देवालयाच्या परिसरात उभी केली होती. स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे इत्यादींची अनेक दुकाने रांगेत मांडलेली होती. काही दुकानातून विविध प्रकारची खेळणी आकर्षण पणे मांडून ठेवलेली होती. कुटुंब कल्याण, हिवताप निर्मूलन याची माहिती देणारी सरकारी दालनेही जत्रेत दिसत होती. देवालयाच्या डाव्या बाजूला गुरांचा बाजार भरला होता. त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्याचा आहार याचीही काही दुकाने मांडलेली होती. देवीचे दर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या दुकानात डोकावत होते; आवश्यक वस्तू खरेदी करत होते. काही कुडमुडे ज्योतिषी आपले नशीब आजमावत बसले होते.( मित्रांनो हा विनोदाचा भाग झाला) दुसऱ्यांना भाग्योदय सांगताना त्यांचे भाग्य मात्र फडफडते.

बालकाच्या आनंदात भर घालणारे फिरते पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलही जत्रेत होती. एका बाजूला लाल मातीत रंगले होते. देवीच्या साक्षीने गावकरी हा सारा आनंद मनमुराद पणे लुटत होते साऱ्या जत्रेतून संध्याकाळ होईपर्यंत आम्ही मनमुराद भटकलो. भूक-तहान तर सहज विसरून गेलो होतो. पुढच्या वर्षी जत्रेला येण्याचा संकल्प सोडून मी घराकडे परतू लागलो.

hope it helps you........

plz mark as brainlest answer.........

plz plz plz plz plz plz plz plz plz

Similar questions