MArathi Nibandh on''
Manoos Aamar Zala Tar''
Answers
माणूस अमर झाला तर.....
“अमर" म्हणजे ज्याला कधीही मरण नाही असा.
"अमरत्व" हा शब्द खुप सुंदर आहे.'अगदी शंभर वर्षे आयुष्य तुला'असं बरेचदा ऐकलही असेल, ऐकायला किती गोड वाटत ना !
जन्माला येणं हे सातत्याने चालूच राहील पण मरणार मात्र कुणीही नाही, त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होईल.
संपत्ती कमावण्यासाठी वेळेचे बंधन न राहील्यामुळे ,माणसाची काम करण्याची गती,जगण्याची धडपडच शांत होईल.
कारण माणसाच्या सरासरी ७० वर्षाच्या आयुष्यामध्ये तो साधारणतः ५०वर्षापर्यंत ,सर्व काही मिळवण्यासाठी चढाओढ लागलेली असते. पण मरण तर येणारच नाही, म्हणजे आपल्याकडे भरपुर वेळ आहे असा विचार मनात रूजेल आणि लोक आळशी बनतील.
लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषण आणि प्रदूषणामुळे असंख्य आजार जन्माला येतील.
समाजातील आणि परिवारातील लोकांचे परस्पर मतभेदही वाढतील.
या सारख्या असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागेल.
माणूस "अमर"तर असेल पण अनेक आजार जडल्यामुळे,परस्पर प्रेम न राहील्यामुळे,गुन्हेगारी वाढल्यामुळे जगावसं वाटणार नाही ......आणि "अमरत्व"हे वरदान न ठरता शाप ठरेल.