India Languages, asked by anishadavid6860, 11 months ago

marathi nibandh raigad killa picnic

Answers

Answered by tusharbadugujar30161
0

Answer:

plz check on the google

Answered by AnushkaNibandhe
2

Answer:

दरवषीर्प्रमाणे यंदाही आमच्या शाळेची सहल गेली होती. सहल जाण्याच्याविषयी एक आठवडा अगोदर गुरुजींनी आम्हा सर्व मुलांना सहलीविषयी सांगितले. सहलीचे ठिकाण होते किल्ले रायगड.

बघता बघता दिवसामागून दिवस गेले. सहल जाण्याची तारीख होती. ११ फेब्रुवारी. अखेर सहलीचा दिवस उजाडला. शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे सर्व मुलं शाळेचा गणवेश घालून ठीक सकाळी ५.४५ वाजता शाळेत जमली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेच्या आवारात तीन मोठ्या लक्झरी बसेस उभ्या राहिल्या. शाळेच्या आवारात प्रथमच पालकांची गदीर् झाली होती. प्रत्येक पालक आपल्या बिन ओळखीच्या पालकांशी सहलीविषयी विचारपूस करत होता.

रायगडाची समुदसपाटीपासूनची उंची २८५१ फूट तर रागडवाडीपासून १२५०फूट आहे. रायगड हा किल्ला हा उंच व मजबूत असल्याने शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्यास राजधानी म्हणून घोषित केले होते. रायगडावरील मुख्य दरवाजा म्हणजे महाद्वार. या दरवाजाशिवाय गडावर जाण्यास दुसरी वाट नाही. महाद्वाराचे भव्यपण व मजबूती पाहून मन विस्मयाने केवळ दाटून आले. त्यानंतर आम्ही गंगासागर हे तलाव पाहण्यास गेलो. गंगासागरात शिवछत्रपींच्या राज्याभिषेकासाठी आणलेल्या सप्तसागर आणि महानद्यांचे तीर्थ अभिषेकानंतर यात टाळण्यात आली होती. म्हणून या तलावाचा 'गंगासागर' हे नाव पडले. त्यानंतर आम्ही नगारखाना पाहण्यास निघालो. नगारखान्याच्या आतील बाजूस मेघडंबरी दिसत होते. मेघडंबरी म्हणजे शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा. आम्ही सर्व मुले मेघडंबरी जवळ उभे होतो. तेव्हा सरांनी आम्हाला काहीतरी आश्चर्य दाखवणार असल्याचे सांगितले. आमचे सर नगारखान्यापाशी गेले. नगारखान्यापाशी दोन सर आपापसात हळू आवाजात बोलत होते. ते बोलणेही आम्हाला स्पष्ट ऐकू येत होते. मेघडंबरी पासून नगारखाना २०० मीटर लांब असूनही त्यांचे बोलणे आम्हाला स्पष्ट ऐकू येणे हे जणू आश्चर्यच!

सर्व ठिकाणे पाहून झाल्यानंतर अखेर आम्ही सर्व मुले व शिक्षक शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी पोहोचलो. समाधीपाशी पोहोचताच सर्व मुले शांत झाली. शिवाजी महाराजांची ती समाधी पाहून आम्हा सर्व मुलांच्या डोळ्यात पाणी आले. शिवाजी महाराजांची समधी दिसायला किती भव्य आणि रम्य! तेथे हिंदू धर्म रक्षिणारा एक नरसिंह अखेरची चिरनिदा घेत होता. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या डावीकडे वाघ्या कुत्र्याची समाधी होती. वाघ्या कुत्रा म्हणजे शिवाजी महाराजांचा जीवाभावाचा कुत्रा होता. याच वाघ्या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी मारली होती. शेवटी आम्ही सर्वजण समाधीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.

Found this on the internet, you can modify this and write...

i have only include important points.

hope it helps

Pls mark as BRAINLIEST ANSWER if you like it

:)

Similar questions