marathi nibandh valvanti pradesh bolto
Answers
Answer:
Sorry I don't know marathi.
Explanation:
Please mark my answer as brainlist I will follow you trust me.
Answer:
भूभागाचे वैशिष्ट्य : डावपेच (Tactics) आणि पुरवठाव्यवस्था (Logistics) या दोन्हींवर भूमितलाच्या स्वरूपाचा गहन परिणाम होतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांतील युद्धपद्धती तेथील भूमितलाच्या स्वरूपानुसार (टरेन) बदलते. मरुभूमीत सर्वत्र वाळू आणि जागोजागी वाळूचे डोंगर असतात. त्यातून वाहनांची ये-जा करणे अवघड होते आणि वाहतूक केवळ उपलब्ध असलेल्या मोजक्या रस्त्यांमार्गेच मर्यादित राहते. फक्त रणगाडे आणि तत्सम वाहनेच आडमार्गाने (Crosscountry) मार्गक्रमण करू शकतात. काही तुरळक झुडपे सोडल्यास तेथे झाडांचा पूर्ण अभाव असतो. पाण्याचे स्रोत अभावानेच उपलब्ध असल्यामुळे पाण्याची कमालीची ददात (उणीव) भासते. दिवसा ४५ ते ४९ अंशाचे उच्च तपमान, तर रात्री कडाक्याची थंडी असते. वारंवार तुफान वादळे होतात आणि त्या वेळी वाळूने आसमंत भरून जातो. या साऱ्याचा सैनिकांच्या आरोग्यावर आणि शस्त्रास्त्रे व वाहनांच्या सक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे वाळवंटी प्रदेशातील युद्ध आव्हानात्मक ठरते.
वाळवंटी प्रदेशातील युद्धभूमी : एक प्रतिकात्मक चित्र.
सैनिकी कारवायांसमोरील आव्हाने : वाहनांच्या चलनवलनासाठी हंगामी रस्त्यांची गरज भासते आणि ते बनवण्यासाठी अभियांत्रिकी गटाच्या (Engineer Core) तुकड्या आणि साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे लागते. सैनिकी कारवाया प्रामुख्याने आडमार्गाने प्रवास करू शकणारे रणगाडे आणि तत्सम वाहनांवर आधारित ठेवाव्या लागतात. वाळूच्या उंच डोंगरांना पार करून जाणे अवघड असल्यामुळे हालचाल मुख्यतः डोंगरांमधील जागेमध्येच मर्यादित राहते. झाडाझुडपांचा आडोसा उपलब्ध नसल्यामुळे सैनिक आणि वाहनांना शत्रूच्या नजरेपासून छपून राहणे (Camouflage and Consealment) कठीण होते. त्यामुळे सैनिकी कारवाया विशेषेकरून रात्रीच्या अंधारातच कराव्या लागतात. वाळवंटातील कारवायांसाठी सैनिकांची संख्या इतर भागांतील कारवायांच्या तुलनेने अधिक प्रमाणात असावी लागते. आक्रमक शत्रूच्या चलनवलनाला (Movement) कोणतेही नैसर्गिक अडथळे (Natural Obstacle) नसल्यामुळे भूसुरुंग आणि काटेरी तारेचे अडथळे मोठ्या प्रमाणात उभे करण्याची गरज पडते व त्यासाठी अमाप संसाधने लागतात. वाळवंटात दिशादर्शन (Navigation) अत्यंत अवघड होऊन जाते व त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ‘जीपीएस’वर अवलंबून राहावे लागते. शत्रूच्या विमानांपासून संरक्षण करणे कठीण असते. जरी भुसभुशीत वाळूमध्ये खणणे सोपे असले, तरी वाळूला बळकटी देण्यासाठी वापरावयास लागणाऱ्या विविध साधनांमुळे मोर्चेबांधणीचे काम क्लिष्ट आणि संथ होऊन जाते. मऊ वाळूवर आदळणाऱ्या तोफगोळ्यांच्या अंतिम परिणामात क्षती होत असल्यामुळे त्यांचा वापर अधिक मात्रेत करावा लागतो. या सर्वांमुळे वाळवंटातील युद्ध आणि युद्धपुरवठा (Operational Logistics) हे कष्टप्रद आणि क्लिष्ट होते. त्याला आयोजकाचे एक दु:स्वप्न म्हणावे लागेल.
भारताच्या सीमेवरील वाळवंटे : भारत-पाकिस्तान पश्चिम सीमेवरील थर वाळवंटातील वाळूचे डोंगर ईशान्य ते नैऋत्य दिशेत वसलेले आहेत आणि त्यांचे टोक ईशान्येकडे असते. थर वाळवंटाचे दोन विभाग करता येतील. पहिला, अधिक विकसित, तुलनेने जास्त वनश्रीमय आणि वाहनांसाठी अधिक सुकर असा जैसलमेरच्या उत्तरेचा भाग. त्याला ‘अर्ध-मरुमय’ (Semi-Desert) असे संबोधले जाते. दुसरा, जैसलमेरच्या दक्षिणेचा वाहतुकीसाठी कठीण, तुरळक रस्त्यांचा आणि वैराण असा, पार कच्छचे रण आरंभ होण्यापूर्वीचा प्रदेश. वाळवंटातील डोंगरांची उंची आणि आकार दक्षिणेकडे वाढत जातात. अर्थातच दक्षिणेकडील विभागात सैनिकी कारवाया उत्तरेकडील विभागापेक्षा अधिक कठीण असतात.
थर वाळवंटाचा प्रदेश पाकिस्तानातही पसरलेला आहे. त्यातील बहावलपूर ते फोर्ट अब्बासपर्यंतचा प्रदेश अर्ध-मरुमय आहे आणि त्याच्या दक्षिणेला बादिनपर्यंत पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे.
संरक्षणात्मक कारवाया (Defensive Operations) : मरुमय प्रदेशात उभारलेली संरक्षणफळी ही प्रामुख्याने शहरे किंवा गावांसारखी जनकेंद्रे आणि वाहतूकमार्गांवर आधारित असते. शत्रूला आडमार्गाने हालचाल करण्यास भाग पाडणे हे त्यामागचे उद्दिष्ट असते. महत्त्वाच्या शहरांभोवती उभ्या केलेल्या मोर्चेबंदीला ‘नोडल पॉइंट’ म्हणतात. इतर गावांभोवती उभारलेल्या मोर्चेबंदीला ‘स्ट्राँग पॉइंट’ अशी संज्ञा आहे. असे विविध नोडल आणि स्ट्राँग पॉइंट्स मिळून वाळवंटी प्रदेशातील मोर्चेबंदी तयार होते. त्यांच्यामधील मोकळी जागा सांधण्यासाठी भूसुरुंगक्षेत्रे (Mine Fields) पेरली जातात. त्यांच्यावर संरक्षणासाठी ‘फिरती पथके’ (Mobile Troops) तैनात केली जातात. शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवून त्याची त्वरित माहिती देण्यासाठी सक्षम अन्वेषणप्रणालीची (Surveillance) नितांत आवश्यकता असते. पुरेशी माहिती मिळाल्यावर शत्रूला प्रबंध घालण्यासाठी सुयोग्य ठिकाणी ठेवलेले विविध पातळीवरील राखीव दस्ते (Operational and Strategic Reserve) वापरले जातात.
वाळवंटातील मोर्चेबांधणीसाठी डोझर्स, पाणीपुरवठा अवजारे, भूसुरुंग, रस्तेबांधणीसाठी यंत्रे वगैरे अभियंतासाधने (Engineer Equipments) मोठ्या प्रमाणात पुरवावी लागतात. त्याचबरोबर अभियांत्रिकी गटाच्या (Engineer Units) तुकड्यांचे प्रमाण इतर प्रदेशांतील युद्धकारवायांच्या तुलनेने अधिक लागते. त्याचबरोबर वाळवंटी युद्धासाठी तोफखाना दलाच्या तुकड्या आणि तोफगोळे अधिक प्रमाणात लागतात. वायुसेनेची लढाऊ विमाने आणि अन्वेषणासाठी हेलिकॉप्टर वाळवंटी प्रदेशातील संरक्षणफळीसाठी महत्त्वाचे साहाय्य देतात. त्याचबरोबर कवचित दलाचे रणगाडे आणि कवचित पायदळ (Armour and Mechanized Infantry) यांच्यावर वाळवंटातील फिरत्या कारवायांकरवी (Mobile Operations) शत्रूचा हल्ला परतवण्याची जबाबदारी असते.