Marathi police thane che kamkaj
Answers
Answer:
महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १० पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पध्दतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १० आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.
Explanation: