Hindi, asked by palk1, 1 year ago

marathi short story on mother

Answers

Answered by arundhatimarathe
33
एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल !!

arundhatimarathe: Plzzzz mark it as brainliest
Answered by preetykumar6666
6

आईचे प्रेम

एक जोडपं होतं, ज्याला रोहित नावाचा मुलगा आहे. ते कायम आनंदात जगले आणि त्यांचा मुलगा रोहित लहान मुलामध्ये वाढला. आणि एक दिवस या जोडप्याने त्यांच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोहितचे लग्नानंतर त्याच्या आईवडिलांबद्दल चिडचिडेपणा जाणवू लागला आणि जेव्हा एक दिवस वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्याने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांनी वृद्धाश्रमात जाण्याची इच्छा नसतानाही, त्याने त्यांना सक्तीने अशा ठिकाणी पाठविले जेथे कदाचित त्यांना जीवनाच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रवेश नसेल. तो आठवड्यातून एकदा आईकडे वृद्धाश्रमात जात असे. एके दिवशी त्याला समजले की त्याची आई गंभीर आजारी आहे आणि तिच्या आयुष्याच्या काही तासांनंतरच ती बाकी आहे. त्यादिवशी त्याने आपल्या आईला भेटायचं ठरवलं आणि तिला पलंगावर झोपलेले आढळले. कोठूनही त्याचे हृदय वाईट वाटू लागले की त्याने आपल्या आईशी नेहमीच असेच वागवले नाही.

त्याने आपल्या आईला विचारले की शेवटच्या वेळी तो असे काही करू शकेल का ज्यामुळे तिला आनंद होईल. यावर त्याच्या आईने उत्तर दिले की प्रिय मुला, कृपया येथे खोल्यांमध्ये काही चाहते स्थापित करा, कारण या घराच्या कोणत्याही खोल्यांमध्ये पंखा नसतो. आणि येथे राहणा  वृद्धांसाठी फ्रिज देखील खरेदी करा. येथे राहणा-या बर्‍याच वेळेस फ्रीजच्या अभावामुळे बर्‍याच वेळा खराब झाल्यामुळे जेवणाशिवाय झोपावे लागते. आणि, मुला, त्या कारणास्तव, मला बर्‍याच दिवसांपासून अन्नाशिवाय झोपावे लागले. बेटा, घाबरून जात असताना, जेव्हा तुला फक्त काही तास शिल्लक आहेत तेव्हा तू मला या सर्व गोष्टी कशासाठी विचारत आहेस? आईने उत्तर दिले की मुला, मला काळजी आहे की एक दिवस जेव्हा तुमचा मुलगा तुम्हाला येथे पाठवील तेव्हा तुम्ही येथे आरामात जगू शकणार नाही. तर, तू येथे येण्यापूर्वी, मला मिसळण्यापूर्वी मला सर्व काही पाहिजे आहे. आपल्या आईचे हे शब्द ऐकून मुलाचे मन भारावून गेले. आईचं प्रेम असं असतं !! हे काहीही मागणी नाही !!

Similar questions