Marathi speech mazha kutumba
Answers
Answer:
कुटुंब मिळून एक समाज तयार होतो आणि समाज मिळून एक देश बनतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीच्या समाजात कुटुंबाला एक महत्वपूर्ण स्थान दिले गेले आहे. कुटुंब हा समाजाचा एक केंद्रबिंदू आहे.
मानवी कुटुंबात राहून आपण सर्व काही शिकतो. कुटुंब हा शब्द ऐकताच प्रेम करणारी आई, लाड करणारे बाबा, लाडकी बहीण, गोष्ट सांगणारी आजी आणि आपल्या सोबत खेळणारे आजोबा ते चित्र आपल्या डोळ्या समोर येते.
कुटुंब म्हणजे एकाच घरात एकत्रित राहणारे आणि एकमेकांच्या नात्यात परस्पर संबंध आहे तसेच एकमेकांची काळजी घेणारे म्हणजे कुटुंब होय. आपल्याला वेगवेळ्या प्रकारची कुटुंबे पाहायला मिळतात.
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कुटुंब खूप महत्वाचे असते. कुटुंब हे तिची काळजी घेते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याच्या कुटुंबाचे खूप मोठे योगदान असते.
मुलांना शिकवण्याचे काम सुद्धा कुटुंब करते. कोणाचे कुटुंब हे छोटे असते तर कोणाचे कुटुंब हे मोठे असते. एखाद्याच्या घरात कमी माणसे असतात तर एखाद्याच्या घरात जास्त माणसे असतात. त्याच प्रमाणे माझे कुटुंब हे लहान आहे.
माझ्या कुटुंबात मी माझे आई – बाबा, आजी – आजोबा, भाऊ आणि छोटी बहीण राहते. माझ्या घरामध्ये सर्वजण माझ्या आजोबांच्या शब्दाचे पालन करतात. ते म्हणतील त्याच प्रमाणे सर्वजण वागतात.
माझे आजोबा नेहमी आम्हाला शिस्त, स्वच्छता, मूल्य आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व सांगतात. माझी आजी सुद्धा खूप चांगली आहे. ती आम्हाला रात्री झोपताना चांगल्या – चांगल्या गोष्टी सांगते.