India Languages, asked by myronfernandes, 19 days ago

Marathi speech प्रदूषण एक समस्या ​

Answers

Answered by tajit9914
1

Answer:

प्रदूषण एक समस्या

Explanation:

प्रदूषण हे एक हळू हळू प्रभाव दाखवणारे विष आहे. आणि ते प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते. प्रदूषणाला मुख्यतः तीन भागात विभाजित केले आहे वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण.

वायुप्रदूषण हे वाहनांमधून निघणारे इंधनाचे धूर, औद्योगिक कारखाने, उडणारी धूळ इत्यादी कारणांमुळे होते. या दूषित वायू ला श्वासाद्वारे आत घेतल्याने हृदय संबंधी रोग निर्माण होतात. 

निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे प्रदूषण ध्वनिप्रदूषण आहे, हे प्रदूषण वाहनांचे हॉर्न, औद्योगिक कारखान्यातील मशीन चे आवाज, लग्न तसेच इतर समारंभातील डीजे इत्यादी अनेक कारणांमुळे होते. अत्याधिक ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा आणि काना संबंधी रोग वाढतात.

जल प्रदूषण ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या आहे. नदी व तलावात कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ व प्लास्टिक कचरा टाकल्याने जल प्रदूषण होते. 

आज प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत आहे. या प्रदूषणाच्या समस्येला कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत व लोकांना प्रदूषणाने होणाऱ्या समस्यांविषयी जागृत करायला हवे.

Answered by archanaghagardare
0

Answer:

जसजसे जगाने शहरीकरण स्वीकारले, मदर नेचरने हिरव्यागार जमिनींचे आधुनिक शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये रूपांतर होताना पाहण्याचा मोठा भार उचलला. जे घडले ते नैसर्गिक आपत्तींचे मार्ग आहे, मग ते भूस्खलन असो किंवा जंगलातील आग, आम्हाला पृथ्वीच्या ग्रहात काहीतरी चुकीचे असल्याचे संकेत देत आहे.

अनेकदा उघड्या डोळ्यांना पकडता येत नाही अशा गूढ मार्गाने काम करणे, प्रदूषण ही एक धोकादायक घटना आहे ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना कारणीभूत ठरते. ही एक प्रचलित पर्यावरणीय चिंता असल्याने, शालेय आणि महाविद्यालयीन चाचण्या तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये लेखन विभागाअंतर्गत ते अधिक प्रमाणात विचारले जाते.

Similar questions