Marathi
• वृत्तांत लेखन :- वृक्षारोपण दिवस उत्साहात साजरा
Answers
Answer:
पाली (रायगड) : शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचा वसा घेत रायगड जिल्हा परिषद पिलोसरी शाळेतर्फे रविवारी (ता.1) मोठया उत्साहात वृक्षदिंडी सह वृक्ष लागवड करण्यात आली. गतवर्षी जगलेली झाडांचा वाढदिवस मुलांनी उत्साहात साजरा केला. यावेळी शालोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम झाला.
सर्व विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. तसेच शाळेतील मुलांनी वक्षरोपणाचा आनंद घेतला त्याच बरोबर गतवर्षी जगलेली वृक्षांचा वाढदिवस मुलांनी उत्साहात साजरा केला. याच दिनाचे औचित्य साधून ठाणे, पुणे व मुंबईतील व पिलोसरीतील माजी विद्यार्थी शाळेत एकत्र येऊन मुलांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप केले. तसेच माजी विद्यार्थी सुहास यादव यांचा वाढदिवस सर्व मुलांनी साजरा करून शाळेने त्यास वृक्ष भेट दिली. सर्व माजी विध्यार्त्यानी शाळेस सतत मदतीचा आश्वासन देऊन शाळा सुविधा व गुणवत्ता वाढीचा वसा घेतला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी वृक्षारोपण दिनाचे महत्व सांगुन सर्वांचे आभार मानले.
मागील वर्षी लावलेली झाडे जगली त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. या वर्षी लावलेली झाडे देखील आम्ही सगळे जण मिळून चांगल्या प्रकारे जगवु.
- संस्कृती नाडकर, विद्यार्थिनी
या आधी मुलांनी शाळेत सीडबॉल बनविले होते. आपल्या आजुबाजूच्या परिसरात हे सिडबॉल रुजन्यासाठी टाकण्यात आलेत. लावलेल्या झाडांची योग्य काळजी व देखभाल करून संवर्धन केले जाते.
- राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक, राजिप शाळा, पिलोसरी
hope it helps you
pls mark it as brainliest
Explanation:
Answer:
I don't understand the question