Marathri speech on ऑनलाईन शिक्षण काळाची गरज
Pls one speech on this topic in marathi . Please it's urgent
Answers
Explanation:
आज जेव्हा कोरोना व्हायरसने आपण ‘गृहीत धरलेले’ जग हादरवून टाकले आहे आणि व्यापक प्रमाणावर मानसिक चिंता आणि अस्तित्वाची अनिश्चितता निर्माण केली आहे, अशा महत्वपूर्ण टप्प्यावर आपण शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ म्ह्णून अत्यंत वाईट पद्धतीने अयशस्वी ठरलो आहोत, याविषयी मला खेद वाटते. या गोंधळलेल्या क्षणी शिक्षणाचा अर्थ आणि उद्देश याविषयी पुनर्विचार करण्याऐवजी आपण केवळ ऑनलाइन अध्यापनासाठी योग्य अॅप्स कशी वापरायची जेणेकरून ‘सामाजिक अंतराच्या’ अडथळ्यावर विजय मिळवता येईल अशा तांत्रिक प्रश्नांना महत्व देताना दिसत आहोत. हे करणे म्हणजे कृत्रिमरीत्या ‘सर्वसामान्य पारिस्थिती’ असल्यासारखे दाखवणे आणि आपल्या आयुष्यात मूलभूतपणे काहीही बदलले नाही असा आव आणण्यासारखे आहे. म्ह्णूनच आपण तीच पाठ्यपुस्तके, तोच अभ्यासक्रम, तीच स्वगते, त्याच परीक्षा आणि त्याच असाइनमेंट या बरोबर यावेळी ऑनलाईन अध्यापन’ या अद्भुत तंत्रज्ञानाच्या जोरावर पुढे जाऊ शकतो असे आपल्याला वाटत आहे.कोरोना संबंधित मानसिक शोषणाची जाणीव करून घ्या. व्यक्तीला मृत्यू ही आता सांख्यिकी संकल्पना वाटत नाही. तो खरा आहे. त्याचे अस्तित्व इथे आहे. हा विषाणू कोणत्याही क्षणी आपल्या बंदिस्त समुदायात शिरू शकतो आणि आपल्याला आपणच खोकतोय आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा परिस्थितीत सापडू शकतो. पण त्याचवेळी एक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लॅपटॉपवर त्याचे समाजशास्त्राचे प्राध्यापक ‘स्नोबॉल नमुना पद्धती’ आणि सामाजिक संशोधनाची ‘तंत्रे’ शिकवताना आढळतात. हे विवेकशून्य नाही का? किंवा, मध्यमवर्गीय कुटुंबातील बारा वर्षाच्या एका मुलाला टाळेबंदीमुळे एका लहान खोलीत अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखे वाटत असूनही ‘ऑनलाइन अध्यापन’ पुढे जाणे आवश्यक असल्यामुळे ’त्याला कुटुंबात उपलब्ध असलेला एकमेव स्मार्टफोन वडिलांकडून उधार घ्यावा लागतो. त्यावर त्याचे गणिताचे शिक्षक त्यांना जीवन विरोधी ‘टक्केवारी’ किंवा ‘नफा-तोटा’ ही प्रकरणे पूर्ण करताना दिसतात, हे विवेकशून्य तर आहेच पण असंवेदनशील आहे. ही एक प्रकारची हिंसा आहे.जर शिक्षण खरोखरच जीवनदायी आहे, तर शिक्षणाने तरुण मनांना जागृत केले पाहिजे. त्यांच्या जाणिवेतील सखोल पातळीवर जाऊन कोविड -१९ ने निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांना मानसिक सामर्थ्य दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर लयबद्ध संवाद निर्माण करून त्यांच्या समस्या आणि शंका समजून घेतल्या पाहिजेत. आत्ता भय सामान्य आहे, बळींना बदनाम केले जात आहे आणि ‘अंतर राखणे’ हे नवा परवलीचा (संभाषित) शब्द झाला आहे. अशा परिस्थितीत आपण स्वतःबरोबरचे आणि जगाबरोबरचे संबंध पुन्हा पारिभाषीत करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. आणि म्हणून आत्ता शाळेतील विद्यार्थी चतुर्भुजाची घनता कशी मोजतात हे शिकले नाहीत किंवा त्यांनी मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची दहा कारणे पाठ केली नाहीत, तरी त्याने काही बिघडणार नाही. आत्ता गृहपाठ आणि प्रकल्पाचे काम ‘अपलोड’ करण्याचा ताण नाही, तर जखम भरून काढणारा स्पर्श महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे, महाविद्यालय / विद्यापीठाचे प्राध्यापक यांनी नित्याचे वर्ग चालवून लेविस-ट्रॉस यांचा ‘संरचनावाद’ किंवा थर्मोडायनामिक्सचा सिद्धांत यावर व्याख्यान दिले नाही, तरी त्याने मानवी बुद्धिमत्तेचे नुकसान होणार नाही. खरं तर, काळाची गरज ही जागृत बुद्धिमत्ता, सखोल धार्मिकता आणि गहन संवेदनशीलता यांचे एकत्रीकरण आहे. एक शिक्षक म्हणून आपण या प्रक्रियेत भाग घेऊन अधिकृत अभ्यासक्रमाच्या पलीकडे पाहू शकतो का?या संदर्भात मला तीन मुद्दे मांडावेसे वाटतात. पहिला मुद्दा, आपल्याला हे समजून घ्यावे लागेल, की कोरोना व्हायरसने आधुनिकतेची स्वतःची धारणा नष्ट केली आहे. या आधुनिकतेच्या धारणेमध्ये निसर्गावर मानवाचे वर्चस्व असल्याची संकल्पना, तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर अमर्यादित ‘प्रगतीवर’ आधुनिकतेचा असलेला आत्ममग्न विश्वास आणि तिची भाकीत, नियंत्रण आणि व्यवस्था स्थापना करण्याची शक्ती यांचा समावेश होतो. म्हणूनच जर आपण विमर्शक (Reflexive) आणि ग्रहणक्षम (Receptive) असू, तर आपल्याला नवीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. उदाहरणार्थ:- आपण अभिमानी जेत्यांसारखे न जगता भटक्यांसारखे नम्र जगणे कसे शिकू शकतो? आपण आपले पर्यावरणाशी असलेले सेंद्रिय नाते कशा प्रकारे पुनर्स्थापित करू शकतो? त्या दृष्टीने आपण हा विचार केला पाहिजे, की आपण अण्वस्त्रे, अंतराळ संशोधन, मेगा रुग्णालये आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची जी उपासना करतो ती किती आभासी आहेत. हा अदृश्य विषाणू अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या आत्मविश्वासाच्याही चिंधड्या करू शकतो, या वस्तुस्थितीचा सामना आपण कसे करणार आहोत? म्हणजेच आपण नवीन जगाच्या शोधात आधुनिकतेची शिकवण कशी पुसून टाकणार आहोत?दुसरे म्हणजे कोरोना व्हायरस आणि संबंधित टाळेबंदीने आपल्याला स्वतःच्या अंतर्मनाचा सामना करण्यास भाग पाडले आहे आणि हे सोपे नाही. कारण आधुनिकतेच्या युगात आपण प्रामुख्याने ‘बाह्य’ क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे; जगात काम करण्यासाठी आपण तांत्रिक कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे आणि याचा परिणाम म्हणजे आपल्यातील बरेचजण आपले भय आणि राग, अहंकार आणि आक्रमकता, वेदना आणि उत्कटता किंवा आपली स्वप्ने आणि प्रार्थना या अंतर्मनातील जाणिवा समजून घेण्याची कला गमावून बसलो आहोत. खरंतर, आपली ‘बाह्य-दिग्दर्शित’ जाणीव आपल्या आंतरिक जाणीवा समजून घेण्यास असमर्थ आहे. जगभर आपल्याला मानसिक उबग, कंटाळवाणेपणा, अर्थहीनता आणि घरगुती हिंसाचाराची पुनरावृत्ती दिसून येते आहे यात काही आश्चर्य नाही. म्हणूनच, आपण आपल्या अंतःकरणाचे पोषण कसे करतो, सहनशक्ती आणि संयम कसे विकसित करतो, शांततेची तीव्रता कशाप्रकारे समजून घेतो आणि आपल्यातील अदृश्य शक्तींना कशाप्रकारे फुलू देतो हा खरा प्रश्न आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ या पुस्तकातील म्हाताऱ्याप्रमाणे आपण या संकटाच्या या क्षणाचे रूपांतर जीवनदायी आयुष्यात कसे करू शकतो?More
Answer:
it's rock dude