marthi report topic is जागतिक महिला दिवस
Answers
जागतिक महिला दिन दर वर्षी ८ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. हा दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी साजरा केला जातो.
सर्वात प्रथम हा दिवस अमेरिका मध्ये सोशलिस्ट पार्टी च्या सांगण्यावरून २८ फेब्रुवारी १९०९ ला साजरा केला गेला. परंतु नंतर हा दिवस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करू लागले. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि पहिले काही देशांत महिलांना मतदान कण्याचा अधिकार नव्हता. त्यांना हा अधिकार देण्याच्या उद्देशाने १९१० मध्ये सोशलिस्ट इंटरनेशनल च्या कोपेनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. ह्या दिवसाचे महत्व अजूनच वाढले जेंव्हा फेब्रुवारी १९१७ मध्ये महिना अखेर रविवारी महिलांनी “bead and peace” साठी आंदोलन केले आणि नंतर ते हळू हळू वाढत गेले व जार ला रशियाची सत्ता सोडावी लागली. त्यानंतर जी सरकार तयार झाली त्यामध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला.
रशिया मध्ये जेंव्हा आंदोलन सुरु झाले होते तेंव्हा तिथे ज्युलिअन कालनिर्णय वापरत होते. ज्यानुसार फेब्रुवारी चा अखेरचा रविवार हा २३ तारखेला होता परंतु जगभरात त्यावेळी ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरत असल्यामुळे आणि त्या कालनिर्णयानुसार २३ फेब्रुवारी हा दिवस बाकी जगभरात ८ मार्च होता. म्हणूनच ८ मार्चला जगभरात जागतिक महिला दिनाच्या स्वरुपात मनाला जातो.