मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जग प्रसिद्ध आहे
Answers
Answer:
मसाल्याच्या पदार्थासाठी भारत हा देश जगप्रसिद्ध आहे
Answer:
आपला देश मसाल्याच्या पदार्थासाठी पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी आपल्या देशाशी इतर देशांचा व्यापार असण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. आपल्या स्वयंपाकात आपण अनेक प्रकारचे मसाले वापरतो. पण आता संगणकाच्या युगात जग जवळ आलं आहे. अनेक परदेशी पदार्थाशी आपला परिचय झाला आहे आणि त्यामुळेच मसाल्याच्या परदेशी पदार्थाशीही थोडाफार परिचय झाला आहे. पण आता हे पदार्थ मोठमोठय़ा दुकानांमधून मिळत आहेत आणि वापरले जात आहेत. परदेशी मसाल्यांच्या चवी ओळखीच्या झाल्या आहेत, इतकंच नव्हे तर त्या चवींची चटकही लागली आहे, तरी जेवढी माहिती आपल्या मसाल्यांविषयी आहे तितकी परदेशी मसाल्यांची नाही. ही माहिती करून घेतली तर आपल्या मसाल्यांप्रमाणोच हे परदेशी मसालेही फक्त चवीच्या उपयोगाचे नसून बहुगुणी असल्याचं सहज लक्षात येतं.