Science, asked by jatinchaudhary7545, 1 year ago

मस्तिष्कपुच्छाला इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. असे का?

Answers

Answered by kylejenifer
3

which language is it ......

please excuse me I am not able to understand the language .....

Answered by shmshkh1190
7

मानवी मेंदू हा खूपच गुंतागुंतीचा आहे.

मस्तिष्क पुच्छ हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग आहे, याचेच पुढे मेरुरज्जूमध्ये रुपांतर होते.

मस्तिष्क पुच्छ हा शरीरातील अनैच्छिक क्रिया नियंत्रण करत असतो.  

जसे कि हृदयाचे धडकणे, श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे, शरीराच्या आत घडणारी पचनाची क्रिया, खोकणे , शिंकणे, लाळ निर्माण करणे अशी सगळी कार्ये जी शरीरात आपोआप घडत असतात ती कार्ये मस्तिष्क पुच्छ नियंत्रित करत असतो.

जर मस्तिष्क पुच्छ दुखावला गेला आणि त्याला इजा जर झाली तर या अनैच्छिक क्रिया घडू शकत नाही, हृदय काम करणे सोडून देते, श्वास थांबून व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

Similar questions