Mata yashoda krishna k kus roop par mohit hai
Answers
Answer:
हुबेहुब कृष्णाप्रमाणे वेशभूषा केलेल्या उद्धवास यमुनानदीवरून परत येताना पाहून गोपी त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी संभाषण करू लागल्या. त्या म्हणाल्या, तू निश्चितच कृष्णाचा दूत म्हणून त्याचा संदेश घेऊन आला असणार. कृष्णानेही आपल्या माता-पित्यानाच संदेश दिला असणार; कारण आई-वडिलांचा स्नेहबंध तोडणे ऋषी-मुनींनाही शक्य होत नाही, तर कृष्णासारख्या प्रेमळ पुत्रास कसे शक्य व्हावे ? ऋषी-मुनी सार्या सांसारिक मोहपाशातून मुक्त असतात. ते विरक्त असतात. कोणताहि सांसारिक मोहपाश त्यांना बांधून ठेऊ शकत नाही; पण आई-वडिलांच्या प्रेमात मात्र ते गुंतलेले असतात. इथे माता-पित्यांच्या प्रेमाची तर महती कळतेच; पण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचेही वैशिष्टय दिसून येते. त्याला आता त्याचे खरे माता-पिता, वसुदेव-देवकी, हे भेटले होते, त्याने शत्रूला जिंकले होते, त्याचे विश्व विशाल झाले होते. परंतु तोपर्यंत ज्या नंद-यशोदेने त्याचे पालन-पोषण करून त्याच्यावर जिवापाड प्रेम केले होते; त्यांना तो विसरला नव्हता. (तो जरी विष्णूचा अंश असला तरी सध्या तो मानवी अवतारात असल्याने सर्व भाव-भावनांनी युक्त होता.) शैशवावस्थेत लहान बालकास आईवडिलांच्या ज्या प्रेमाची, त्यांच्या लाडाकोडाची आवश्यकता असते, त्यांनीच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो, ते ते सर्व त्याला नंद-यशोदेकडून भरभरून मिळाले होते. असे आईवडिल आपल्या विरहाने अतीव दुःखी असणार याची त्यास कल्पना होती. तोही त्यांच्या मायापाशात गुंतला होता, म्हणून त्याने दूताकरवी संदेश दिला हे योग्यच म्हणावयास हवे.