मतदान करने हैं अपने कर्तव्य आहे व ती आपली जवाबदारी आहे या विधनाविष्यी तुमचे मत मांडा.
Answers
Explanation:
मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य
लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याच बरोबर या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा, याची जबाबदारी ही प्रत्येक मतदारावर आहे. त्यामुळे पैसे न घेता किंवा कोणत्याही अमिषाला बळी न पडता, आपल्या सदसद्िववेकबुद्धीने योग्य त्या उमेदवाराला
ओवेसींवरील हल्ला: गृहमंत्री शहा यांचे संसदेत निवेदन; केली 'ही' विनंती
मतदार म्हणून उमेदवाराला मत देण्यापूर्वी, त्याच्या कामगिरीचे समीक्षण करणे आवश्यक आहे. याआधी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने गेल्या पाच वर्षांत लोकसभेत किती आणि कोणत्या विषयांवर प्रश्न विचारून त्यांचे निराकरण करून घेतले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? लोकोपयोगी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित केला आहे का? प्रत्येकाच्या हाताला काम दिले आहे का? पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, वाहनसाधने या अत्यंत गरजेच्या सोयी पुरविल्या आहेत का? या प्रश्नांचा मागोवा घेणे अत्यंत आवश्यक आहे. मागोवा घेत असताना या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी आल्यास, परत त्याच उमेदवाराला तुम्ही मत देणार आहात का? हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. नुसत्या भेटीगाठी, आश्वासने, आणि आर्थिक मदतीचे अमिष देणाऱ्यांनाच पुन्हा मत द्यायचे का? हे प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारून त्याची उत्तरे शोधायला हवीत.
Answer:
उत्तर : (१) संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांत मतदान करणे हे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य मानले आहे. कर्तव्याबरोबरच ती आपली जबाबदारीही आहे.
(२) निवडणुकांमुळे लोकशाही टिकून राहते. नागरिकांनी मतदानाद्वारे प्रामाणिक व कार्यक्षम प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत.
(३) मतदार मतदानाच्या बाबतीत उदासीन असतील, तर शासन लोकहिताकडे दुर्लक्षच करील. म्हणून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य तर आहेच, परंतु ती त्यांची जबाबदारीही आहे, असे मला वाटते.
(४) ही माझी भूमिका मी माझ्या परिसरातील लोकांना पटवून देऊन त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करेन.
Explanation:
follow me