मतदार जागरूकता वर मराठी निबंध
Answers
Answer:
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्विप कार्यक्रम राबविला जातो. तसेच नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात.
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.
मतदार जागरूकता
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे भारतातील लोकशाहीमुळेच संपूर्ण जगात भारताचा एक वेगळा ठसा उमटलेला आहे. भारतातील लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणजे भारतातील निवडणुका.
भारतातील निवडणुका ह्या लोकशाही पद्धतीने होत असतात त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे मतदार व त्याचे मत अतिशय महत्त्वाचे असते. प्रत्येक नागरिक नागरिकाने केलेल्या मतदानानुसारच त्या प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधी हा निवडला जात असतो म्हणूनच योग्य त्या प्रतिनिधीला पाठवण्याचे काम निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून करणे गरजेचे असते. जर अयोग्य असा व्यक्ती निवडला गेला तर तो त्या क्षेत्राचा विकास कधीच करू शकत नाही आणि म्हणूनच मतदार हा जागरूक असला पाहिजे.
प्रत्येक क्षेत्राचे विशिष्ट अशा समस्या असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी असणे गरजेचे असते. आपल्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत व त्या समस्या सोडवण्यासाठी कोण आपल्याला मदत करू शकतो याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. आपल्या क्षेत्राच्या कोणकोणत्या गोष्टींवरती लक्ष दिले पाहिजे तसेच कोणकोणत्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे या सर्वांची जाणीव असलेला व्यक्तीच योग्य तो व्यक्ती आपला प्रतिनिधी म्हणून निवडू शकतो या सर्वांचे जाणीव असणारा व्यक्ती म्हणजेच जागरूक मतदार होय .
समाजामध्ये मतदार जागरूकता निर्माण करणे खूप गरजेचे असते कारण प्रत्येक नागरिक जर जागरूक झाला तर तो योग्य तो प्रतिनिधी निवडू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या उपलब्ध माध्यमांच्या सहाय्याने जागरूकता निर्माण केली पाहिजे . प्रत्येक व्यक्तीने आपले मत दिलेच पाहिजे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/49717236
https://brainly.in/question/49975449
#SPJ3