मध्य हिमोढ हिमनदीच्या कोणत्या भागात असतात ?
plz tell me ans
Answers
Answer:
दोन हिमनद्या ज्या भागात एकमेकींना येऊ
न मिळतात, त्या भागात हिमनद्यांचे पार्श्ववर्ती हिमोढ एकत्र येतात. अशा पार्श्ववर्ती हिमोढाचे संचयन होऊन निर्माण होणाऱ्या ढिगांना मध्य हिमोढ असे म्हणतात.
Answer:
मध्य हिमोढ हिमनदीच्या कोणत्या भागात असतात--
Explanation:
नदीने वाहून आणलेला गाळ कोठेकोठे साचतो. त्या स्थानांनुसार हिमोढाचे चार प्रकार पडतात. १)भू-हिमोढ २)पार्श्व हिमोढ ३)मध्य हिमोढ व ४)अंत्य हिमोढ.
हिमनदीतून वाहून आणलेल्या व निक्षेपित झालेल्या खडकाच्या डबरीला हिमोढ म्हणतात धोंडेमाती]. हिमोढ हेहिमनदीच्या निक्षेपण कार्यातील प्रमुख भूरूप आहे. अतिथंड हवामाना-मुळे पाण्याचे अपवादात्मक प्रसरण होऊन खडकाचे होणारे विदारण, हिमलोट, भूमिपात किंवा बर्फाच्या घर्षणाने हिमनदी वाहत असलेल्या दरीची झीज अशा कारणांनी हिमनदीच्या पात्रात प्रचंड आकाराच्या दगडापासून चिकणमातीच्या कणाइतक्या बारीक गाळाचा ढीग होतो. हिमनदीला पडलेल्या भेगांतून यातील काही गाळ तिच्या तळाशी पोहोचतो, तर काही भेगांमध्येच अडकून पडतो. तळाशी जाऊन पोहोचणारे दगड हिमनदीच्या प्रवाहामुळे उताराकडे लोटीत नेले जातात. त्यांच्याघर्षणाने हिमनदीच्या खोऱ्याचा तळभाग खरवडला जातो आणि त्यातील खडकांचे लहान-मोठे तुकडे सुटे होऊन प्रवाहपतित होतात. हिमनदीच्या पात्रात तिच्या तळाशी हिमाचे द्रवीकरण व पुनर्गोठण या क्रिया आळी-पाळीने चालू असतात. यामुळेही तळाच्या खडकांना तडे पडतात व त्याचा परिणाम कालांतराने खडकांचे तुकडे सुटे होऊन हिमनदीबरोबर वाहण्यात होतो. अशा रीतीने निरनिराळ्या मार्गांनी खडकाळ माती हिमनदीच्या पात्रात वाहू लागते. बर्फ वितळला की या दगडांचे व मातीचे ढीग तेथेच पडून राहतात, त्यांनाच हिमोढ म्हणतात व स्थानानुरूप निरनिराळ्या नावांनी ते ओळखले जातात I
#SPJ3