Maza avadata Chand essay in Marathi language
Answers
माझा आवडता छंद
छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड. प्रत्येकाला वेगळा वेगळा छंद असतो. मला आहे वाचनाचा छंद. लहानपणीच मला वाचनाचा नाद लागला. नेमका कसा व केव्हा हा नाद मला लागला हे मला आठवत नाही.
आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवनाच्या सुट्टीत, खाली तासात आम्ही मित्र तिथे जायचो व जे मनाला वाटेल ते वाचायचो. कधी वर्तमान पत्र तर कधी मासिक. यामुळे वाचनाची ओढ वाढतच गेली.
वाचनालयातून आम्हाला प्रत्येक आठवळ्यात दोन गोष्टींच्या पुस्तका मिळायच्या. ती वाचून त्या गोष्यीचा सारांश आम्हाला आमचे सर वर्गात विचारायचे. आणि त्याकरता आम्ही गोष्टीच्या पुस्तका वाचायला शिकलो आणि तोच माझा छंद झाला असेल कदाचित.
माझ्या या वाचनाचा छंद बाबांना कळला व त्यांनी मग गावातील सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचा खाता उघडला. मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. पण या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायच.
वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात जाताना तर पुस्तकच माझे सोबती असतात. या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळते. माझा ज्ञानात ही वृद्धी होत असते.
माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्यात गोष्टीच्या पुस्तका, मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे. मला केवळ मराठीतील नाही तर हिंदी व इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला आवडते.Answer:
brashtachar ek abhishap