maza avadhata rutu in Marathi nibhandh please help for 8th class
Answers
Explanation:
आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतुंमध्ये वर्षाऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मनोवर, अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी नकोसा झालेला असतो; उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात. सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसासे टाकत असते.
सर्व पशुपक्षी थंडगार सावलीचा निवारा शोधात असतात आणि त्याच वेळी पाऊस येतो धो धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमात गारवा शिरतो. चारचर सृष्टी तृप्त होते. असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार अन्ही ?जून मध्ये शाळा सुरु होते. त्याच्या आसपास पावसाळा सुरु होतो.
नवे वर्ष, नवे वर्ग, नवा गणवेश नवी पुस्तके आणि नाकी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याच वेळी चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्या सोबत नाचत-बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगाच्या छत्र्या, तर्हेतर्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते. जणू ती वाटच आपल्यासोबत उत्साहाने शाळेत येत आहे