English, asked by varunidhya, 1 year ago

Maza avadta chand -dance essay in marathi

Answers

Answered by tejasmba
813

माझा आवडता छंद – नृत्य

छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड. प्रत्येकाला वेगळा-वेगळा छंद असतो. छंद म्हणजे एक उपासना, एक ध्यास, ध्येय, काहीतरी करण्याची ओढ, स्फूर्ती. छंद म्हणजे केवळ रिकामा वेळ घालवणे नव्हे, तर आपल्या छंदाद्वारे आपलं व्यक्तित्व समोर आणायचा.

परमेश्वराने सर्व माणसाला एकसारखेच बनवले आहे. परंतु प्रत्येकात काहीतरी वेगळे-वेगळे गुण दिलेले आहेत. आपण स्वतः त्या गुणाची पारख करू शकतो. प्रत्येकाला आपला छंद जोपासता येत नाही. या जगात साधारणतः सर्वांनाच कुठला न कुठला तरी छंद असतोच. छंद जोपासले कि रिकामा वेळ सत्कारी लागतो व आवडीचे काम केल्याने मन ही प्रसन्न राहते.

छंद कुठलाही असू शकतो. कुणाला वाचनाचा तर कुणाला लिहिण्याचा छंद. कुणाला गाणी म्हणायला आवडत तर कुणाला वाद्य वाजवायला आवडत तर कुणाला वस्तु संग्रह करण्याचा छंद असतो.

माझा छंद या पेक्षा वेगळा आहे. व तो म्हणजे नृत्य. लहानपणापासूनच मला नृत्याची आवड लागली. आई मला सांगायची, मी दोन वर्षाची होते तेव्हाच कुठलंही गाणं कानी पडलं कि माझे पाय लगेच थरकायचे. टी. व्ही पुढे उभ राहून त्यात चालू असणार्‍या प्रत्येक गाण्याची हुबेहुब नक्कल मी करायची. आणी मोठं होता-होता मला नृत्य करायला आवडायला लागलं. आणि नृत्य करणे हात माझा छंद होऊन गेला.

मा‍झ्या या आवडीला मा‍झ्या पालकांचा भरपूर सहयोग मिळाला. माझा हा छंद जोपासण्यासाठी त्यानी मला डान्स क्लासला पाठवायला सुरवात केली.  तिथे मला योग्य गुरु मिळाले. व विविध प्रकारचे नृत्य मी शिकायला लागले. छोट्या-मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ लागले. आज माझा आत्मविश्वास वाढला. इतकी वर्ष झाली पण मी नृत्य शिकतच आहे. आता पाश्चात्य नृत्य कला  शिकणं हेचं माझे पुढचं पाऊल आहे. पण या छंदा मुळे मी कधीचं अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलय. आधी शाळेचा अभ्यास संपवायचा आणि मग नृत्य अभ्यास.

असा आहे माझा छंद. हा मला नेहमी जपायचा आहे. व या क्षेत्रात खूप नाव मिळवाव हीच माझी इच्छा आहे. 
Answered by tanisha1216184
131
माझा आवडता छंद for std 5
Similar questions