India Languages, asked by jasonjoshi9524, 9 months ago

Maza avadta full Marathi mein essay class Teesri ke liye

Answers

Answered by YOGESHmalik025
0

➡️नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येक जण आपल्‍या आवडत्‍या छंदातुन आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.कुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात. तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.

तसे पाहता आमचे कुटुंब फार छोटे आहे. आई, बाबा आणि मी. पण अगदी लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, गर्दी व्हावी, गडबड उडावी असे वाटे. आई सांगते की, मी लहानपणी आपल्याकडे 'हळदीकुंकू' कर, 'सत्यनारायणाची पूजा' कर असा नेहमी हट्ट करीत असे. कारण त्यामुळे घरात खूप माणसे येत. सुट्टीचा वार रविवार वा सुट्टीचा 'मे' महिना मला फार प्रिय आहे. कारण सुट्टीमुळे खूप पाहणे घरी येतात. सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवितो. त्यांना वाटते की किती विनम्र, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणसवेड त्यांना 'अनभिज्ञ' असते.

Similar questions