Maza avadta Khed nibandh in Marathi
Answers
Answer:
माझा आवडता खेळ बैडमिंटन आहे.हा खेळ मी माझ्या भावंडाबरोबर आणि मित्र-मैत्रिणींबरोबर खेळते. हा आमचा सगळ्यांचा आवडता खेळ आहे.
बैडमिंटन हा खेळ मैदानात खेळला जातो.मैदानाच्या मध्यभागात एक जाळी असते,जी मैदानाचे दोन समान भाग करते.हा खेळ एका जोडीमध्ये किंवा दोन जोडींमध्ये खेळला जाऊ शकतो.यासाठी फक्त दोन गोष्टींची म्हणजेच बैडमिंटन रैकेट आणि फुल(शटलकॉक) गरज लागते.
या खेळामध्ये रैकेटने फुल एकमेकांकडे फेकले जाते.जर एखादा प्रतिस्पर्धी फुल दुसऱ्या बाजूला फेकण्यात अयशस्वी झाला,तर गुण त्याच्या विरोधी प्रतिस्पर्धीला मिळतो.फुल फेकताना जर ते जाळीत अडकले किंवा मैदानाच्या बाहेर गेले तरीही गुण प्रतिस्पर्धीला मिळतो.
या खेळामध्ये शरीराची खूप हालचाल होते,त्यामुळे शरीराला भरपूर व्यायाम मिळतो.तसेच हा खेळ खेळत असताना बरेच गमतीदार प्रसंगही होतात,त्यामुळे बैडमिंटन खेळायला खूप मजा येते.
Explanation: