Art, asked by hritvichaudhari034, 2 months ago

Maza Avadta Sant Essay in Marathi​

Answers

Answered by karthikdodamani2004
6

Answer:

माझा आवडता संत – संत ज्ञानेश्वर

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे संत एकनाथ, संत तुकाराम, संत कबीर, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई असे अनेक संत होऊन गेले. या संतांनी आपल्याला संस्कृतीला मोठा वारसा दिलाय. संतांनी लोकांना वारकरी संप्रदायाचे महत्व पटवून दिले. त्याचा प्रसार केला. आध्यात्म हा संतांच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो. संतानी लोकांना आपल्या शिकवणीतून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकताची भावना निर्माण करून त्यांना त्याचे महत्त्व समजवून सांगितले आहे.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव येथे इ.स १२७५ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते. त्यांच्या आईचे नाव रुख्मिणीबाई होते. त्यांचे वडील एक संन्यासी होते. निवृत्ती नाथ ,सोपानदेव ,मुक्ताबाई व ज्ञानेश्वर असे ते चार भावंडं होते.

निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे पहिले गुरु होते. त्यांच्या वडिलांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. या सनातनी समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे मंजूर नव्हते. त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले.

ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना ब्राम्हण मुलांना मिळणार्‍या संस्कारांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडचीच शिक्षा आहे असे सांगितले. मुलांना संस्करांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला.

Explanation:

Hope it's helpful for you

Similar questions