India Languages, asked by dhakadrohit5402, 1 year ago

Maza avadta sant essay in marathi in

Answers

Answered by Neeraj23051
662
जन्म : १२७५
मृत्यू :१२९६

हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातीलपैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.ज्ञानेश्वरांनी भगवद्‍गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी हा ग्रंथ मराठीत लिहिला. कृष्णाच्या अवस्थेचे ज्ञानेश्वरांनी नाट्यमय वर्णन केले आहे. तद्कालीन समाजाने त्यांचा अतिशय छळ करुनही त्या दुःखाचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनात कुठेच घडविले नाही हे त्यांचे मोठेपण होय.

Answered by Anonymous
464
hey friend!!
_____________________________________________________________

संत ज्ञानेश्वर (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आळंदी येथे झाला.[१] सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.अनुक्रमणिका [लपवा] 
१ बालपण
२ कार्य
३ हेही पाहा
४ संदर्भ
५ बाह्य दुवे

[संपादन]
बालपण

संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत - रुक्मिणीबाई या कुळकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या थोरल्या भावाचे नाव निवृत्तीनाथ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती.

त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. तत्कालीन समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना ब्राम्हण मुलांना मिळणार्‍या संस्कारांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडचीच शिक्षा आहे असे सांगितले. मुलांना संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या.
[संपादन]
कार्य

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
स्पुटकाव्य (उदा.अभंग, विराणी, चागदेव पासष्टी, आदि.)
ज्ञानेश्वर हरिपाठ
अमृतानुभव

संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

___________________________________________________________


hope this may help u!!


PauloDybala10: Very helpful. Thanks
Anonymous: okk
Similar questions