English, asked by shubhamghumade12, 9 months ago

Maza avadta Vishay in Marathi Marathi language​

Answers

Answered by mddanishalam191416
3

Answer:

माझ्या इयत्वेतील सर्वच विषय मला आवडतात. पण माझा आवडता विषय आहे ‘मराठी’

मराठी ही माझी मातृभाषा आहे. मी इंग्रजी माध्यमाच्या शळेत शिकते.

बहुतेक व्यवहारात हिंदी भाषाच वापरली जाते. तरीपण मला सर्वात आवडते मराठी भाषा! अगदी लहानपणी माझी मराठीशी ओळख झाली.

माझे आईबाबा दोघेही डॉक्टर असल्यामुळे दिवसभर कामात असत. मला सांभाळायला मावशी आमच्याकडे राहत. अख्खा दिवस मावशीच्या सहवासात जात असे.

तिच्या माझ्याशी सर्व गप्पागोष्टी चालत त्या शुद्ध मराठीत ! त्यामुळे काऊचिकपासून ज्ञानेश्वर, नामदेवांपर्यंत सर्वाच्या गोष्टी मी मावशीकडून मराठीत ऐकल्या होत्या.

नवीन पुस्तके आणली की, मराठीचे पाठयपुस्तक मी प्रथम वाचून काढते.म्हणून वर्गात शिकताना मला कधीच कंटाळा येत नाही. एखादी कविता मी प्रथम

वाचलेली असते, पण बाईनी तीच कविता शिकवल्यावर मला ती अधिक समजते.

पाठ्यपुस्तकातील बहुतेक सगळ्या कविता मला तोंडपाठ आहेत. इतर अनेक मराठी कविता माझ्या पाठ आहेत. त्यांचा मला निबंध लिहिताना उपयोग होतो.

मी मराठी शुद्धलेखन चांगले समजावून घेतले आहे. त्यामुळे माझ्या लेखनात फारशा चुका होत नाहीत. भरपूर वाचन केल्यामुळे मराठी विषयात मला चांगले गुण मिळतात. त्यामुळेही हा माझा आवडता विषय ठरला आहे.

Answered by till57
4

✯ᴀɴsᴡᴇʀ✯

‘अरे यार, आज मूव्ही देखते है’, ‘ओय, एक्झाम जवळ येतेय…आता स्टडी मस्ट आहे’ ही वाक्यं ऐकल्यासारखी वाटतायत ना? रोजच्या बोलण्यात ही हिंग्लिश-मिंग्लिश कानांवर पडते. असं असलं, तरी मायबोलीविषयी तरुणाईला तेवढंच प्रेम आहे.

‘मराठी बोलण्याची लाज का वाटते?’ हा प्रश्न ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने ‘मुंबई टाइम्स’ने युवा कट्टावर चर्चेला घेतला. या जिव्हाळ्याच्या विषयावर प्रतिक्रियांचा महापूरच आला. ‘होय, आमच्याकडून मराठी भाषेवर अन्याय होतोय’, हे प्रांजळपणे मान्य करण्याचं धाडसही तरुण-तरुणींनी दाखवलं आहे. या प्रातिनिधिक प्रतिक्रियांमध्ये तरुणाई म्हणते, की घरापासून शाळा-कॉलेजपर्यंत सारे संस्कार इंग्रजीमध्ये. त्यामुळे मराठी भाषेशी नातं जोडलंच जात नाही. आमच्या मनावर बिंबवलं गेलं की ते इंग्रजीचंच महत्त्व. पण आता आपली मातृभाषा जोपासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असा संकल्पही तरुणाईने

दाखवलं आहे. या प्रातिनिधिक प्रतिक्रियांमध्ये तरुणाई म्हणते, की घरापासून शाळा-कॉलेजपर्यंत सारे संस्कार इंग्रजीमध्ये. त्यामुळे मराठी भाषेशी नातं जोडलंच जात नाही. आमच्या मनावर बिंबवलं गेलं की ते इंग्रजीचंच महत्त्व. पण आता आपली मातृभाषा जोपासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असा संकल्पही तरुणाईनेसोडला आहे.

खरंच हे दिवस महाराष्ट्रात आहेत का? मातृभाषा आहे म्हणून मराठीचं कौतुक आहेच. पण बऱ्याचदा अस होतं की मुलं मराठी कुटुंबातून आलेली असली तरी त्यांच्यावर इंग्रजीचा प्रभाव जास्त असतो. अगदी उलट परिस्थिती जेव्हा इतर भाषिक लोक एकत्र येतात तेव्हा असते. तेव्हा खंत वाटते की, आपलं आपल्या मातीशी नातं तुटतंय का? महाराष्ट्राच्या मातीशी असलेले घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी आपली मातृभाषा आहे. जिचा गोडवा अवीट आहे, जिने राष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कारविजेते लेखक-कवी घडवले, जिने बॉलीवूडकरांनाही भुरळ घातली ती भाषा बोलण्यात कमीपणा वाटण्याचं कारणच नाही. दुसऱ्याची वाट न पाहता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तसंच कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळांची व्याप्ती वाढली पाहिजे. जर जास्तीत जास्त मराठी साहित्य जनमानसांत पोहोचलं, तर मराठी केवळ कागदापूर्तीच मर्यादित न राहता सगळ्यांच्या मनामनात राहील.

कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त्य २७ फेब्रुवारी मराठी दिन म्हणून साजरा केला जात असला तरी ते सगळं एका दिवसापुरतंच असतं. नंतर पहिले पाढे पंचावन्न अशी आपल्या सगळ्यांची अवस्था होते. 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा', ही कविता फक्त वाचण्या आणि ऐकण्यापूर्तीच उरली आहे. 'मराठी पाऊल पडते पुढे' हे गाणं आहे तेवढ्यापुरतंच चांगलं पण आज मराठी पावलं मागे पडत आहेत. मराठी भाषेसाठी काही ठोस पाऊलं नाही उचलली गेली तर मराठी भाषा इतिहासात जमा होईल. त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे. त्याशिवाय उपाय नाही. पुढील काही ओळी माझ्या माय मराठीची महती सांगणाऱ्या

मराठी आहे आपली शान

चला वाढवू तिचा मान

मराठी आहे आपल्या श्वासात

ठेऊ तिला जीवनाच्या ध्यासात

हिंदी इंग्रजी आहे भविष्याच्या गरजा

त्यात कमी न होऊ देऊ मराठीचा दर्जा

धरणीच्या पोटातून जिचा उगम झाला त्या मराठी मायबोलीचा सर्वांना विसर पडावा, तिची लाज वाटावी ही खरं तर खंताची बाब आहे. मला वाटतं मराठी भाषेची लाज वाटण्यासोबतच तिचा विस्मरण अधिक होत चालला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि आजच्या स्पर्धेच्या जगात मराठीला मिळत असलेले दुय्यम स्थान तसंच बदलती जीवनशैली आणि मराठी शाळेची घसरणारी संख्या या सर्वांमुळे मराठी भाषा व्यवहारात कमी येते आणि मग त्याला पर्याय म्हणून इतर भाषांचा वापर केला जातो. महाराष्ट्रात राहाणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. जागतिक व्यासपीठावर तिचा उल्लेख, कौतुक झालंच पाहिजे तरच मराठीला योग्य तो दर्जा मिळेल.

Similar questions