mazha aawadta sant essay in Marathi
Answers
Explanation:
प्रस्तावना:
प्राचीन काळापासून आमचा भारत देश महान संतांचा, तत्त्वज्ञानाचा आणि ऋषींचे देश म्हणून ओळखला जातो. या भारत भूमीवर अनेक संतांचा जन्म झाला आहे.
आध्यात्मिक हा त्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनलेला आहे. संतानी लोकांना आपल्या शिकवणीतून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकताची भावना निर्माण करून त्यांना त्याचे महत्त्व समजून सांगितले आहे.
या संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होऊन गेलेत. संत ज्ञानेश्वर हे माझे आवडते संत आहेत. हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न होय.
संत ज्ञानेश्वर यांचा जन्म
संत ज्ञानेश्वर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.
निवृत्ती नाथ, ज्ञानदेव, सोपान देव आणि त्यांची बहिण मुक्ताबाई अशी ही चार भावंडे होती. विठ्ठलपंत हे मुळात संन्यासी होते.
विठ्ठलपंत तीर्थ यात्रा करत – करत आळंदी येथे येऊन स्थायिक झाले. परंतु त्या काळी त्यांना संन्यासाची मुले म्हणून हिणवत असत. म्हणून ज्ञानेश्वराच्या आई – वडिलांनी देहत्याग केला.
निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गुरु
निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर सद्गुरू होते. ज्ञानेश्वरांनी नेवासा क्षेत्रात आपल्या सद्गुरूंच्या कृपेने भगवद गीतेवर टीका लिहिली. या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हटले जाते.
ज्ञानेश्वरांनी भगवद गीतेतील विचार आणि तत्वज्ञान सामान्य लोकांना कळावे म्हणून त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीत लिहिला.
अमृतानुभव ग्रंथ
ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या लेखनानंतर त्यांनी तीर्थयात्रा केली. या तीर्थ्यात्रचा उल्लेच संत नामदेवांच्या तीर्थावळी यामध्ये आढळतो.