India Languages, asked by Jean4292, 11 months ago

mazha avadta karykram in marathi few lines

Answers

Answered by kittusup7
2

Explanation:

माझा आवडता कार्यक्रम कोणता, खूप खूप विचार केला, अनेक चित्रपट अनेक सिरीयल अनेक नाटकं , गाण्याचे कवितांचे कार्यक्रम, अगदी सर्कस ॲनिमल शो बरंच काही असं have डोळ्यासमोरुन गेलं पण उत्तर सापडत नव्हतं, खरं सांगायचं तर त्याचे उत्तर आजही मला मिळालेला नाही. मनात विचार करता करता एवढेच उत्तर सापडलं हो लहानपणी मला जाहिराती बघायला खूप आवडायचं. दोन कार्यक्रमांच्या मध्ये येणाऱ्या अगदी एखाद मिनिटाच्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी आपल्या वाटायच्या. मग ते बडी गजब की भूक लगी असो, किंवा हमारा बजाज, boost सिक्रेट ऑफ माय एनर्जी, निर्मा, कधी त्यातील वडिलांना प्रमाणे आपले बाबा कधी अशी गाडी घेऊन घरी येतील असं वाटायचं. अगदी एखाद मिनिटातच आपलं स करणाऱ्या या चंदेरी दुनियेच्या प्रेमात पडतो आपण. दोन कार्यक्रमांच्या मध्ये अगदी आवडीने या जाहिराती बघण्यासाठी आम्ही तिथेच बसायचो केवळ दोनच चॅनल असल्यामुळे लगेच चॅनल बदलण्याची मानसिकताच नव्हती. आणि ती जाहिरात मनामध्ये घोळत राहायचे. कधी चालता चालता निर्मा सारखी एखादी गिरकी घ्यावी असं वाटे, तर कधी यावेळी तरी आईने जाहिरातीत दाखवलेल्या बिस्कीटचा पुडा महिन्याच्या सामान आत भरावा म्हणून हट्ट सुरू होई. घरी येऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असला की आईची पन्ह तयारी सुरू होतसे मग बाबांच्या मागे लागून रसना सरबत ठेवूया, असं हट्ट असायचा. केस कापण्याची परवानगी नव्हती तरीही पुढचे केस पीने मध्ये गुंडाळून आपणही तरचं रसना तल्या मुली सारखे दिसतो का असं तासन्तास आरशासमोर पाहिले होते. आजही काही खरोखरच चांगल्या जाहिराती आहेत तेव्हा एखादा प्रोग्रॅम चालू असताना ब्रेक, आला की पटकन रिमोट चैनल स्विचोवर करणे आजही जड जातं. आणि विशेष सांगायचं म्हणजे शेजारी घरातील कोणी टीव्ही बघत असतो रिमोट त्याच्या हातात असतो, आणि सवयीप्रमाणे ब्रेक लागल्यावर तो चैनल चेंज करतो, आणि तेव्हाच नेमकी एखादी आवडीची जाहिरात लागलेली असते. मला ती पहायची असते. खरोखरचे एक ते दीड मिनिटांमध्ये निर्माण केलेलं गुलाबी विश्व मनाचा ठाव घेऊन जातं. मला अशा जाहिरातींसाठी काही लिहायला खूप आवडेल. ,"ये दिल मांगे मोर" एवढीशी टॅगलाईन मला खूपच आवडली होती. म्हणूनच मला माझा आवडता कार्यक्रम याचे उत्तर नाही देता आलं कदाचित, पण हे एक ते दीड मिनिटांमध्ये आपलंसं करणारे विश्व माझ्या मनाला भावले आहे.

Similar questions