Mazhe ghar nibandha in marathi
Answers
Answer:
माझ्या घराचे नाव 'आनंदसदन' आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घराचे सर्वात महत्वाचे स्थान असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घराची गरज असते. म्हणून प्रत्येका जवळ स्वतःचे घर असते.
घर ही एक सर्वात सुंदर, छान जागा आणि हक्काची जागा आहे. घर छोटे असो किंवा मोठे प्रत्येकाला आपले घर खूप आवडते. घर हे संपूर्ण जगातील सर्वात प्रिय स्थान मानले जाते. घरामध्ये सर्व माणसे ही अगदी प्रेमाने राहतात.
आज मी ज्या घरात जन्माला आली आहे. ते घर माझ्या जीवनातही सर्वात महत्वाचे स्थान आहे. मला माझे घर हे खूप आवडते.
आम्ही घरात काही रोप ठेवली आहे . त्यामुळे घर प्रसन्न वाटते . आमच्या घराभोवती काही मोठी झाडे आहेत . त्यामुळे छान सावली मिळते .आणि आमच्या घरात सभोवती छोटी फुलबाग तयार केली आहे. त्या बागेमध्ये विविध प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत. जसे की गुलाब, चमेली, मोगरा, जास्वंद इ अनेक प्रकारची फुलांची झाडे आहेत. त्या बागेत इतर झाडे सुद्धा आहेत. त्या झाडांवर अनेक पक्षी येऊन आपली घरटे बनवतात. सकाळी सकाळी उठल्यावर पक्षांचा किलबिल कानी पडतो.
हे निबंध सुधा जरूर वाचवे:-
माझ्या घरात आई-बाबा, आजी-आजोबा,ताई ,दादा आणि मी राहते . घरात आम्ही सगळेजण हसत-खेळत वावरतो. आम्ही सारे मिळून घर स्वच्छ ठेवतो .आम्ही नेहमी पाणी, वीज काटकसरीने वापर करतो. माझे घरात आम्ही सर्व ठिकाणी शोभेच्या वस्तू ठेवल्या आहेत.
माझ्या आजोबांनी आमच्या घरी एक नवीन पाहुण्याला घरी आणले होते आणि तो म्हणजे सर्वांचा लाडका कुत्रा. हा कुत्रा दिसायला खूप सुंदर आणि प्रेमळ होता. आम्ही सर्वानी त्यांचे नाव राँकी असे ठेवले आहे.
माझ्या घरात खूप पुस्तके आहेत. मला घरात कधी कंटाळा येत नाही . मी कधी बाहेर गेली तर मला घराची खुप आठवण येते. माझे घर मला खूप आवडते.
माझे घर हे खूप सुंदर आहे. मी माझ्या घरावर खूप – खूप प्रेम करते.
Explanation:
ke mark me as brainliest