English, asked by S7hri7shvsaumani, 1 year ago

Mazi aai essay in marathi

Answers

Answered by tejasmba
1728

माझी आई

"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरं आहे. आपल्याजवळ खूप धन आहे, पण जर मायेने डोक्यावर हाथ फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थ आहे. जेव्हा एक बालक बोलायला शिकतो तेव्हा पहिले अक्षर तो बोलायला शिकतो ते म्हणजे आई.

मा‍झ्या आईबद्दल मी काय सांगू. मा‍झ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर मा‍झ्या सोबत उभी राहते ती माझी आई. लहानपणा पासून आज पर्यंत मी तिला बघतो आहे. पहाटे सर्वप्रथम ती उठते, मला उठवते, शाळे करता तैयार करते, माझा नाश्ता बनवते, माझी बैग पैक करण्यास मदत करते। माझा डब्बा सुद्धा मी शाळेत निघायच्या आत तयारच असतो.

ही तिची रोजचीच दिनचर्या आहे। सकाळी लवकर उठणे, मला शाळेत व बाबांना ऑफिसामध्ये पाठवणे, घरकाम करणे, संध्याकाळी माझा अभ्यास घेणे व माहिती नाही आणखी किती काम ती करते ते. आणि एवढं केल्यानंतर ही कधीच तिच्या चेहरा वर तो त्रास नाही दिसत कि कधी कंटाळा नाही दिसत.

एकदा तर मला खूप ताप आला असताना ती रात्रभर मा‍झ्या शेजारी बसून पाण्याची पट्टी मा‍झ्या माथ्यावर ठेवत बसली होती। सदा न कदा मा‍झ्या आवड़ीं-निवड़ींची काळजी घेत असते माझी आई.

मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार.. पण आईला नेहमी आनंदात ठेवणं व माझ्याकरिता घेतलेल्या कष्टांच चीज करणं हेच मा‍झ्या जीवणाचं खरं उद्देश्य आणि लक्ष्य आहे।
Answered by Mandar17
259

देव स्वत: जग येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला पाठवले. संपूर्ण जग, ज्याच्यात सामावले जाते तेच आईचे मातृत्व आहे. वयासह मातृत्वाची पकड निश्चितपणे कमकुवत होत असते, परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सावलीत आयुष्य जगण्याची इच्छा असते. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना  भिकारी !!!

माझी आई एक शिक्षक आहे ती शाळेत मराठी शिकवते. आम्ही सर्वजन उठवण्याच्या काही क्षण आधी  पहाटे सकाळी उठून आई घरकाम करायला लागते. आम्हा प्रत्येकासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि घराची देखभाल हे सर्वकाही तीच करते. आम्ही  देखील तिला सर्व काही मदत करतो. परंतु घराची संपूर्ण व्यवस्था तिच्यावर अवलंबून असते. आश्चर्य वाटण्यासारखे आहे की आई एखाद्याच्या आवडीनुसार आणि गरजानुसार सर्व कामे कशी काय करू शकते. ति आम्हाला शाळेतून मिळालेला गृहपाठ पूर्ण करण्यासही मदत करते. आई आम्हाला सुलभ आणि सोप्या पद्धतीने जगभरातील चांगल्या आणि ज्ञानी गोष्टी समजून सांगते. तिला आमच्या बुद्धीचा चांगला अंदाज आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरात आजारी पडते. तेव्हा आई त्याची देखील देखभाल अत्यंत चांगल्या रितीने करते. शिक्षक म्हणून, माझी आई नेहमीच प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करते. आम्ही आईवर खूप प्रेम करतो. आई जरी रागावली तरीसुद्धा तिच्या बद्दल मनात राग येत नाही कारण प्रेम आईच्या रागामध्ये देखील लपलेले आहे. म्हणूनच आई हे एक देवाचेच रूप आहे.

Similar questions