Hindi, asked by Szasrar9705, 5 months ago

Mazi mayahinytli dupar var 8 te 10 vakya

Answers

Answered by sandeepmishrajms
3

Explanation:

मे महिन्यातील दिवस होता तो. दुपारची वेळ. रखरखीत उन. दुपारी झोप घेण्याची सवय नसल्याने घरातच काही करमणुकीच्या शोधात इकडून तिकडे हिंडत होतो. खिडकीजवळ येऊन थांबलो. खिडकीला विशिष्ट आवरण असल्याने बाहेरील उन्हाची तीव्रता भासत नव्हती मात्र बघून ती समजण्याचा प्रयत्न मी करीत होतो. एरवी रस्त्यावर फिरणारी कुत्री दूरवर दिसत नव्हती. चिमण्या कावळे गर्द झाडीतील सावली बघून विसावली होती. कॉलनीतील सर्व घरांजवळ शुकशुकाट होता. कॉलानीवासियांची ‘दुपारची झोप’ होती ती :). निरव शांतता, रखरखीत उन, कुठल्याही सजीवाची नसलेली हालचाल आणि निसर्गाचे डालवले गेलेले हे सुंदर रूप बघणारे माझे डोळे. कोणीतरी म्हटले आहे ‘ निसर्गाच्या प्रत्येक रुपात सौंदर्य आहे, गरज आहे ती फक्त बघणाऱ्याची’ कदाचित हे वाक्य अनुभवण्याचा प्रयत्न मी बघणाऱ्याच्या भूमिकेतू करत होतो. किती अनाकलनीय आहे हा निसर्ग !….विचारात गुरफटत चाललो होतो कि तेवढ्यात रस्त्याच्या एका टोकाला काही हालचाल जाणवली. डोळे हालचाल होणाऱ्या जागी स्थिर केले. जशीजशी ती आकृती जवळ येत गेली तशी ती फेरीवाल्याची असल्याचे स्पष्ट झाले.

डोक्यावर मोठी टोपली त्यात रंगबेरंगी रुमाल. टोपी, कुर्ता-पायजामा, लांब दाढी आणि ध्धीपाड शरीरयष्टी असा एकंदरीत त्याचा पेहराव होता. त्याची नजर विसाव्यासाठी सावली शोधत होती आणि घरासमोर असलेल्या पारिजातकाच्या झाडाखाली त्याचा शोध संपला. त्याने डोक्यावरील भार बाजूला ठेवला आणि पारिजातकाच्या खोडाला टेकून विसावला. त्याचे शरीर घामाने चिंब भिजले होते. धाप टाकण्यासाठी त्याचे तोंड अलगदच उघडले जात होते. चेहऱ्यावरील घाम टिपण्यासाठी त्याच्या हातांची चाललेली धावपळ वेगळीच. खिडकीला विशिष्ठ आवरण असल्याने मी त्याचे निरीक्षण करू शकत होतो मात्र त्याला मी दिसत नव्हतो. त्याची नजर आसपासच्या घरांवर भिरभिरत होती. तहान भागवण्यासाठी पाण्याचे काही घोट मिळावे असे जणू त्याची नजर बोलत असावी पण आमच्या कॉलनीवासियांची ‘दुपारची झोप’ होती ती. सर्व घरांच्या दरवाजावर असणारी शांतता बघून तो हताश झाल्याचे जाणवत होते. माझी पावलं मी झटकन स्वयंपाक घराकडे वळवली. फ्रीजमधून गार पाण्याची बाटली काढली त्यात पिण्यालायक होईल इतपत साधे पाणी घातले आणि त्याच्याजवळ गेलो. त्याला पेल्यात पाणी भरून देवू लागलो. तीन पेले पाणी पिउन होईपर्यंत दोघात कुठलाही संवाद नव्हता. संवाद होता तो फक्त समाधानाच्या भावनेचा. तिसरा पेला पिउन झाल्यावर पेला माझ्या हातात देवून तो म्हणाला ” बहोत प्यास लगी थी बेटा ,शुक्रिया ! अल्ला तुम्हारा भला करे ” आणि तो तसाच समाधानी चेहऱ्याने त्याचे सामान आवरायला लागला.

माझे मन स्तब्ध झाले होते. देणारा आणि घेणारा अशी दोन्ही पात्रे तेथे उपस्थित होती पण त्यात कुठेही वरचढपणा नव्हता. जेवढा घेणारा समाधानी होता तेवढाच देणाराही आणि महत्वाचे म्हणजे या घटनेत ‘पैसा’ या मानवनिर्मित संकल्पनेचा लवलेशही नव्हता. तो त्याचे सामान घेऊन आनंदी चेहऱ्याने मार्गस्थ झाला. मी पण गेट कडे वळलो आणि चालायला लागलो.

मनात असंख्य प्रश्नांचा गोंधळ उडाला होता. ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे’ अशी धर्माची असणारी साधी आणि सोपी व्याख्या आपण आज इतकी कठीण का बनवली आहे? ‘मानवधर्म’ यासारखा सर्वात जुना आणि त्रिकाल सत्य असणारा धर्म आपण का विसरलो? एवढ्या साध्या कृतींमध्ये समाधान लपलेले असताना आपण त्याचे मोजमाप पैशांच्या तराजूत का करतो? साध्या सरळ असणाऱ्या गोष्टी आपण इतक्या कठीण का बनवून ठेवल्यात?

तेवढ्यात आईची हाक कानावर आली आणि मी तसाच अनुत्तरीत प्रश्नांच्या अवस्थेत हाकेच्या दिशेने मार्गस्थ झालो.

pls mark me brainliest

Similar questions