Geography, asked by Vaishnavi7314, 1 year ago

Mazya swapnatil swatch Bharat Essy's

Answers

Answered by shaan5
4
you can search this as this is a political abhiyan
Answered by halamadrid
3

■■माझ्या स्वप्नातील स्वच्छ भारत■■

मला नेहमी असे वाटते की, माझे घर सुंदर व स्वच्छ असावे. घराप्रमाणेच, मी स्वच्छ व सुंदर देशाचा स्वप्नसुद्धा पाहत असते. माझी इच्छा आहे की, माझे देश सगळ्यात सुंदर व स्वच्छ बनावे.

माझ्या स्वप्नातील स्वच्छ भारत असे असेल, जिथे रस्त्यांवर थोडेसेही कचरा किंवा घाण दिसणार नाही.स्वच्छतेमुळे माझ्या देशात चांगले बदल घडतील, त्यामुळे इथे रोगराई पसरणार नाही. जैवविविधता सुधारेल.

पर्यावरण स्वच्छ असल्यामुळे आपले मन प्रसन्न राहील.हवा शुद्ध व स्वच्छ होईल.आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला स्वछ व सुरक्षित वातावरण देता येईल. लोकांच्या आरोग्यात सुद्धा सुधार होईल.

माझ्या स्वच्छ भारताचा सन्मान करून जगातील सगळे देश माझ्या देशाला आदर्श मानतील. दुनियेच्या कानाकोपऱ्यातून लोकं माझ्या देशाच्या सुंदरतेला पाहायला येतील. त्यामुळे देशाचे पर्यटन क्षेत्र सुधरणार. लोकांना रोजगार मिळेल.

माझ्या या स्वच्छ देशाचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या तऱ्हेने पूर्ण प्रयत्न करेन.

Similar questions