me doctor zalo tr easy in marathi
Answers
Answer:
डॉक्टरांना जीवन रक्षणकर्ता मानले जाते. कारण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. म्हणून हे आजार दूर करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते.
त्यामुळे डॉक्टरांना ‘जीवन रक्षक’ म्हणतात. डॉक्टरांना कित्येक वर्ष वैद्यचीय शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. एकदा त्यांना या क्षेत्राबद्दल व्यावहारिक ज्ञान आणि सिद्धांतिक मिळाल्यानंतर ते कोणतेही कार्य हाताळण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात.
आजच्या युगात वैद्यकीय व्यवसायात भरपूर विकास झाला आहे. कारण पूर्वीच्या काळी कोणत्याही आजारावर औषधे ही उपलब्ध नव्हती. पूर्वी उपलब्ध नसलेल्या विविध आजारांवर अनेक औषधे आणि उपचार देखील विकसित झाले आहेत. आज वैद्यकीय तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे.
Explanation:
पाडेन.माझ्याकडून जितके होऊ शकेल,तेवढे मी माझ्या रुग्णांचे जीव वाचवायचे प्रयत्न करेल.मी माझ्या रुग्णांच्या जीवाशी खेळणार नाही,त्यांची फसवणूक करणार नाही.ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत,त्यांना मी कमीत कमी पैशांमध्ये किंवा मोफत उपचार देण्याचे प्रयत्न करेल.दिवस असो की रात्र रुग्णांच्या मदतीसाठी मी हजर राहणार.मी लोकांना सुदृढ व निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायामाचे महत्व सांगणार.
अनाथ किंवा वृद्ध लोकांकडे लक्ष देणाऱ्या एखाद्या संस्थेला मी पैशांची मदत करणार.त्यांना मोफत औषधे देणार.मी माझ्या सगळ्या रुग्णांशी प्रेमाने व आपुलकीने बोलणार व वागणार, त्यांच्या समस्या नीट ऐकून घेणार व समझून घेणार व त्यांच्यावर योग्य ते उपचार करणार.
समाजात डॉक्टरला खूप आदर मिळतो.एका जीवाला वाचवण्याचे मौल्यवान काम डॉक्टर करत असतात.डॉक्टरांना देवासारखे समजले जाते.इतके महत्वाचे काम करणारा डॉक्टर मला व्हायला नक्कीच आवडेल.