CBSE BOARD X, asked by pravinavarhade8950, 1 year ago

me jilhadhikari zalo tar essay in marathi

Answers

Answered by ukarishma85
2

Answer:

प्रशासकीय अधिकारी प्रशासनाचा मुख्य कणा असतो. मी ज्यावेळी माझा कार्यभार हातात घेईन त्यावेळी सर्वप्रथम माझ्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेईन तसेच माझे अधिकारक्षेत्र माझी कर्तव्ये यांची सांगड घालून प्रथम माझ्या भागातील सर्व मूलभूत प्रश्नांचा मुळापासून अभ्यास करून त्यावर उपाय म्हणून आवश्यक तात्कालिक परिस्थितीनुरूप निर्णय घेईन. प्रथम प्रशासकीय कामातील दफ्तरदिरंगाई, कर्मचारी व इतर लोकांची कामचलाऊ वृत्ती यावर नियंत्रण आणून प्रशासन वेगवान बनविणे.

लोकांना अत्याधुनिक सोयीसुविधा व साधनांचा उपयोग करून सर्व आवश्यक ती माहिती, मदत, सल्ला, कागदपत्रे, शंकानिरसन करून लोकांच्या मनात प्रशासनाविषयी प्रथम सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रशासकीय अधिकारी व जनता यांच्यातील अंतर कमी करून प्रशासन जनताभिमुख बनविण्याचा प्रयत्न करीन.वेळ पडल्यास मी माझ्या अधिकाराचा वापर करू अशा भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकवीन. माझी वैयक्तिक अधिकारकक्षा व कर्तव्यांचेही मी पालन करीन.प्रशासनात असताना मी सरकारी संपत्तीचा, सरकारी दस्तऐवज व इतर गोष्टींचा आवश्यक व कायदेशीर असाच वापर करीन. सरकारी गाठी, बंगला, सरकारी सोयीसुविधा यांचा अनावश्यक वापर टाळून या सरकारी सुविधांचा गैरवापर, उधळपट्टी करणार नाही. सरकारी कर्मचारी व नोकरी यांचा वापर खाजगी कामे करण्यास किंवा अशासकीय गोष्टी करण्यास अजिबात करणार नाही. मी माझ्यातर्फे सर्व ती खबरदारी घेऊन काम करीन. मी माझ्या कामात प्रामाणिक राहून खऱ्या अनि सेवक म्हणून काम करीन.प्रशासकीय अधिकारी हा जनतेचा सेवक असतो' याचे भान ठेवून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगला नावलौकिक मिळवून देशाच्या व राज्याच्या विकासास हातभार लावून मी माझे कर्तव्य पूर्ण करीन, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी आदर्श सर्वांसमोर ठेवीन.

Answered by tiwariakdi
0

या पृथ्वीतलावर प्रत्येकाचे मोठे स्वप्न असते. त्याचप्रमाणे; माझंही लहानपणचं एक स्वप्न आहे. हे स्वप्न फक्त माझे स्वप्न नाही तर ते माझ्या वडिलांचे, आईचे स्वप्न आहे. मला आयपीएस अधिकारी बनून माझ्या राज्याची आणि माझ्या देशाची सेवा करायची आहे. मला गरीब लोकांना मदत करायची आहे. तसेच, ज्यांना फी आणि सर्व परवडत नाही अशा गरीब मुलांना मला मोफत शिक्षण द्यायचे आहे.

माझे पालक मला आवश्यक ते देतात आणि ते मला कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतात. माझ्या पालकांना अभिमान वाटावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्या परीक्षेसाठी मी रात्रंदिवस अभ्यास करतो. अलीकडच्या घडामोडींबाबत अपडेट ठेवण्यासाठी मी दररोज द हिंदू वृत्तपत्र वाचतो. मी गोष्टी विलंब करत नाही. मी एक उत्सुक वाचक आहे. मला राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र इ. वाचायला आवडते आणि मला आशा आहे की एके दिवशी मी परीक्षा उत्तीर्ण होईन.

आयएएस अधिकाऱ्याची कर्तव्ये म्हणजे त्याच्या क्षेत्रातील सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था राखणे, भारत सरकारच्या अंतर्गत मुख्य प्रशासनाची कामे करणे, सरकारी कामकाजावर देखरेख ठेवणे, नवीन सरकारी धोरणे आखणे, तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, खर्चाचा मागोवा ठेवणे आणि सादर करणे. खर्चाचा अहवाल राज्य विधानसभेला पाठवतो.

आयएएस अधिकाऱ्याला विशिष्ट क्षेत्राच्या विकासासाठी नवीन नियम आणि धोरणे तयार करण्याचा अधिकार असतो. समजा तुम्ही आयएएस अधिकारी असाल तर तुम्हाला जिथे गरज आहे तिथे तुम्ही नवीन शाळा आणि महाविद्यालये बनवू शकता.

#SPJ5

learn more about this topic on:

https://brainly.in/question/12787078

Similar questions