Math, asked by ay5832855, 11 months ago

me pahileli Jatra nibandh in Marathi

Answers

Answered by ibolbam
0

Answer:

˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙ ʍouʞ ʇuop ᴉ

Answered by halamadrid
4

■■मी पाहिलेली जत्रा:■■

यावर्षी,मी माझ्या आईच्या गावी आसुडगावला, महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरलेली जत्रा पाहायला गेली होती.या जत्रेत मला खूप मजा आली.

जत्रेत लोकांची खूप गर्दी जमलेली होती.शंकराचे देऊळ छान सजवले गेले होते.देऊळासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या.देऊळात रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या.

जत्रेत वेगवेगळी मिठाई,खेळणी,भांडी,पूजेचे सामान,कपड़े,सजावटीच्या वस्तू विकण्यासाठी अनेक दुकाने मांडली होती.तिथे बरेच पाळणेसुद्धा होते.

जत्रेत जादूगराचे खेळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.एक ठिकाणी मदारी माकडांचा खेळ करत होता.झटपट फोटो काढण्यासाठी एक ठेला होता.आम्ही तेथे फोटो काढला.

अशा प्रकारे,मला जत्रेत जाऊन खूप आनंद झाला.

Similar questions