me pantpradhan zalo tar Marathi Kalpanapradhan nibhandha
Answers
Explanation:
बातम्या वाचण्यासाठी म्हणून वर्तमानपत्र उघडले आणि नेहमीसारखीच भ्रष्टाचाराने बरबटलेली प्रकरणे, लाचलुचपत, घोटाळे या बातम्यांनीच वर्तमानपत्र गच्च भरले होते. रोज त्याच समस्या, त्याच बातम्या, जीव वैतागून गेला. वाटलं, मीच पंतप्रधान झाले तर ...? अगदी थोड्या काळात देशाचे चित्रच बदलून टाकेन.
मी पंतप्रधान झालो तर भारतमातेचा, भारतीय जनतेचा मी सेवक आहे, हे कधीच विसरणार नाही. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली आहे ती सार्थ ठरवेन. 'साधी राहणी व उच्च विचारसरणी' या लालबहादूर शास्त्रींच्या तत्त्वाचा अवलंब जीवनात करीन आणि सर्वच मंत्रिमंडळ सदस्यांना या तत्त्वाचे महत्त्व पटवून देऊन, त्यांनासुद्धा हे तत्त्व अवलंबवायला लावीन. मंत्र्यांच्या दौऱ्यांवर होणारे अतिरिक्त खर्च कमी कसा करता येईल, याकडे लक्ष देईन.
मी पंतप्रधान झालो तर ‘सामान्य माणसाला सुखी करणे' व 'देशाचा उत्तरोत्तर विकास साधणे' या दोन गोष्टी माझ्या जाहिरनाम्यात मुख्य असतील. देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण आखताना, योजना कार्यान्वित करताना देशातील कायदेतज्ज्ञ, विद्वान, तज्ज्ञ व्यक्तींशी सल्लामसलत करेन. त्या त्या खात्यातील मंत्री वर्गाची निवड करताना, त्यांना त्या त्या खात्यासंबंधी असलेली आवश्यक माहिती, निस्पृहता या गोष्टी विचारात घेईन. प्रत्येक मंत्र्याचे ज्ञान आणि अनुभव लक्षात घेऊनच खातेवाटप करेन. आरोप असणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना लोकसभेत येता येणार नाही, याबाबत कडक कारवाई करण्याचा विचार करेन.
सामाजिक समस्यांबरोबरच आज सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा वाढता भस्मासूर. हा भ्रष्ट्राचाराचा भस्मासूर सामान्य जनतेला देशोधडीस लावणारा व समाजात वैफल्य पसरवणारा आहे. मी पंतप्रधान झालो तर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, अशी न्याय्य व्यवस्था निर्माण करेन.
वाढत्या लोकसंख्येच्या महत्त्वाच्या समस्येमुळे सामान्यातल्या सामान्य माणसांच्या मूलभूत गरजादेखील पूर्ण होई शकत नाहीत. त्यातूनच पुढे अगदी प्राथमिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनारोग्य, दारिद्र्य, निरक्षरता आणि बेकारी या समस्यांचा जन्म होतो. त्यातून गुन्हेगारी वृत्तीचा आणि गुन्हेगारांचा जन्म होतो. म्हणून मी प्रथम याबाबत जागृकता निर्माण करीन. लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न आणि प्रत्यक्षात योजनांची कार्यवाही करेन.
सर्व सामान्यांना दैनंदिन जीवन जगताना लागणारे धान्य-भाजीपाला, घरगुती गॅस इतर वस्तूंच्या किंमतीचे दर स्थिर राहतील, याकडे लक्ष देईन. वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांकरिता योजनांची आखणी करीन. आजही आपल्या देशात प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने आरोग्यविषयक जागृती नाही, त्यामुळे लोकांना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध करून देईन.
आपल्या देशाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी आवश्यकतेनुसार विदयालयांची स्थापना करीन. उच्च तंत्रज्ञानाच्या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करीन.
धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेत नमूद केलेली आहेत. या तत्त्वांना धक्का लागू देणार नाही. जाती-धर्माच्या नावाखाली होणाऱ्या दंगलीबाबत कडक कारवाई करेन.
भारतासारख्या खंडप्राय देशाचा विचार करता असे दिसते की विविध भाषा, बोली बोलणाऱ्या राज्या राज्यांत एकता असली की कोणत्याही प्रकारे अंतर्गत व बर्हिगत शत्रूचा उपद्रव होणार नाही. एकता व शांततेचे वातावरण देशात राहिले की, देशाची सर्वांगीण प्रगती होण्यास विलंब होणार नाही. त्या दृष्टीने एक सर्वसामावेशक धोरण राबवून राज्या-राज्यांतील शासनात एक समन्वय राखण्याचे काम मी करेन.
एकदर पाहता राज्यकारभार करणे, पाहणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी जे थोर राजे-महाराजे होऊन गेले, ज्यांनी भविष्यातील काळाचा वेध घेत काही उपयुक्त धोरणांची अंमलबजावणी केली, त्यांच्या राज्यकारभाराचा अभ्यास करेन. खास करून शिवाजी राजांचे अष्टप्रधान मंडळाचा कारभार अभ्यासण्यासारखा आहे. त्यातील काही उपयुक्त, मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करता येईल का, हे जरुर पाहिल.
संपूर्ण भारताचा राज्यकारभार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्याला अनेकांचे हातभार लागणे आवश्यक आहे. मी पंतप्रधान झालो तर मी सर्व स्तरांतील नि:स्वार्थी, सेवाभावी, कर्तव्यदक्ष अशा कार्यकत्यांची संघटना तयार करीन आणि 'सुराज्य' निर्माण करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. मी पंतप्रधान झालो तर जगात भारताला गौरव आणि सन्मानाचे स्थान मिळवून देईन.
Answer:
hehehe you have a boyfriend is your age and