Biology, asked by Azmeena23, 8 months ago

me sanghank boltey essay in marathi​

Answers

Answered by qwerty4616
0

Answer:

heres ur ans.

Explanation:

प दिवसांपासुन सिंहगडाची भटकंती करण्याचे मनात होते. पण योग काही जुळुन येत नव्हता. बहुतेक गडकोटांची भटकंती केली होती, पण पुण्यापासुन अगदी जवळ असलेला हा गड काहि अद्याप पाहिला नव्हता. काही आठवड्यापूर्वी एका मित्राचा दिल्लीवरून फोन आला कि तो गणपतीसाठी २ आठवड्याची सुट्टी टाकुन मुंबईला येतोय. तेंव्हा एका दिवसात शक्य होईल असा एखादा छोटासा ट्रेक प्लान कर. मग काय सिंहगड पाहायचा होताच त्यामुळे सिंहगड भटकंतीचाच बेत फिक्स केला आणि त्याप्रमाणे माबोकर वर्षा_म आणि सुर्यकिरणकडुन स्वारगेटवरून कसे जायचे ते विचारून घेतले. पण आयत्यावेळी शनिवारचे जाणे रद्द झाल्याने रविवारी जायचे ठरले. रेल्वेचे बुकिंग फुल्ल असल्याने पहाटे ठाण्याहुन शिवनेरीने स्वारगेट आणि पुढे सिटीबसने सिंहगड पायथा असा फायनल बेत ठरला. ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे (मी, माझे दोन मित्र आणि माझा कॅमेरा ) असे सकाळी साडेदहाच्या सुमारास सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचलो. तसे सिंहगडावर डोणजे गावातुन गाडीने थेट गडाचा माथा गाठता येतो, पण आम्ही चालतच गड सर करण्याचा निर्णय घेतला. पायथ्यापाशी असलेल्या गावातच मस्तपैकी न्याहरी आटपून गड चढण्यास सुरूवात केली. रमतगमत साधारण दिड-दोन तासात गडावर पोहचु असा आमचा मानस होता. मी आपला निसर्गाचे, झाडांचे, पानाफुलांचे फोटो काढत सावकाश चालत होतो (अर्थात याला थोडे कारण वाढलेलं वजनही होते ). एव्हाना बरोबर चालणारे माझे दोन मित्र पुढे गेले. थोडा दम लागल्यामुळे एका जागी मी थोडावेळ बसलो.

चालता चालता सिंहगडाने बोलावयास सुरूवात केली. "लहानपणी इतिहासाच्या पुस्तकातुन, चित्रातुन, ऐतिहासिक कथा-कादंबर्‍यांमधुन, आंतरजालाच्या माध्यमातुन आपण नेहमीच भेटत आलो. पण प्रत्यक्षातील हि पहिलीच भेट. लहानपणी शाळेत असताना जो इतिहास कंटाळवाणा वाटत असे तोच आता दर्‍याखोर्‍यात हिंडत अभ्यासावा वाटतो नां?. चल आज मी तुला माझी पुन्हा एकदा ओळख करून देतो." "माझा जन्म शेकडो वर्षापूर्वी सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगात झाला." सिंहगडाने बोलावयास सुरूवात केली. "माझे पूर्वीचे नाव "कोंढाणा". १६४७ साली शिवरायांनी मला स्वराज्यात आणले, त्याआधी मी आदिलशाही राजवटीत होतो. स्वराज्यात सामील होणे हे माझ्यासाठी खुप आनंदाचे होते, पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढे १६४९ साली शहाजीराजांच्या सुटकेसाठी मला पुन्हा आदिलशाला परत करण्यात आले. पुढे ऐतिहासिक पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले त्यात मी सुद्धा होतो . राजे जेंव्हा आग्र्याहुन सुटुन परत आले तेंव्हा तहात दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी उदेभान राठोड हा गडावर मुख्य अधिकारी होता. तो स्वतः डोळ्यात तेल घालुन माझी राखण करायचा, त्यामुळे कुणाची टाप नव्हती माझ्याकडे बघण्याची. स्वराज्यावर वचक ठेवण्यासाठी तेथे औरंगजेबाने जसवंतसिंगला पुण्याकडे पाठवले होते. जसवंतसिंग एकदा का कोंडाण्याजवळ आला तर गड जिंकणे कठिण होईल हे महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे जितक्या लवकर मला स्वराज्यात सामील करता येईल तितक्या लवकर करायचे असे महाराजांनी ठरवले. हि मोहिम एकाच दिवसात फत्ते करायचे ठरली. महाराजांचा विश्वासु सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबाचे लग्न असल्याने महाराज स्वतः या मोहिमेवर निघण्यास तयार झाले. तानाजीला जेंव्हा हे समजले तेंव्हा "आधी लगीन कोंडाण्याचे, मग माझ्या रायबाचे" अशी गर्जना करत त्याने गड जिंकण्याचे कबुल केले. ४ फेब्रुवारी १६७२च्या त्या रात्री घोरपडीच्या सहाय्याने गडावर चढुन मर्द मावळ्यांनी केलेला पराक्रम तर सर्वश्रुत आहेच. उदेभान आणि तानाजी यांच्यातला तो घनघोर रणसंग्राम मी याची देही याची डोळा पाहिला. तानाजीच्या डाव्या हातातील ढाल तुटली तर तो पठ्ठा डाव्या हाताचीच ढाल करून लढला. अखेर दोघेही रणांगणात पडले. नंतर सुर्याजी मालुसरे याने उरलेल्या मावळ्यांना हिम्मत देऊन विजय मिळवला. तानाजी गेल्याची बातमी महाराजांना समजताच ते म्हणाले, "गड आला पण माझा सिंह गेला" आणि तेंव्हापासुन माझे नाव "सिंहगड" झाले.. पुढे राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी येथेच देह ठेवला. हे सगळे सांगताना सिंहगडाचा स्वर गदगदला.

Similar questions