me zhad boltoy essy in marathi
Answers
एका संध्याकाळी बागेत फिरायला गेलो असतानाअचानक मागून आवाज ऐकू आला. बागेत फारसे कुणीनसल्याने तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. कुणीतरीमला बोलावत होतं,”इकडे ये, ऐक जरा माझं“. मागे वळूनबघितल्यावर समजलं कि त्या बागेत असणारं झाड मलाबोलावत होतं. त्याला माझ्याशी बोलायचं होतं. मी जवळजाताच ते माझ्याशी गप्पा मारायला लागलं. म्हणालं, “अरे , बरेच दिवसांपासून मला कोणाशीतरी बोलायचंहोतं, मनातलं सगळं सांगायचं होतं, पण कोणालाचमाझा आवाज ऐकू येई ना, आज तू माझा आवाजऐकलास आता मला माझं मनोगत तुला सांगता येईल.” मी हि शांतपणे त्याच बोलणं ऐकू लागलो.
“मी झाड आहे. एक झाड. माझे महत्व तर सगळ्यांनाचमाहित आहे पण तरीही आज मला काही गोष्टीसांगाव्याश्या वाटतायत. मला माझे अस्तित्व आहे. मलामाहितीय माझं सगळं आयुष्य माणसासाठी आहे. माझ्याप्रत्त्येक अवयवाचा उपयोग माणसांना होतो. माझी मूळ, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे अगदी सगळ्याचाच. झाडेतुम्हाला सावली देतात, फळे देतात, झाडांची फुले तुमच्याघराची, समारंभाची शोभा वाढवतात. अगदी देव्हाऱ्यातल्यादेवालाही फुलांचा मोह आवरत नाही. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा तुमच्या दैनंदिन जीवनात वापर करता येतो. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यासाठी या आमचा उपयोग होतो. आम्ही ५०० गॅलन वाफ बाहेर टाकत असतो त्यामुळे उन्हाळ्यातही आमच्याखाली जास्त गारवा असतो.
कोकणात असे समजले जाते कि, नारळ कधी कोणाच्याडोक्यावर पडत नाही. म्हणजे आम्हाला एवढी जाणीवआहे कि, आमचे सर्वच आयुष्य आम्ही माणसांसाठी, याजीवसृष्टीसाठी बहाल केलंय. मोकळ्या माळरानावरचरणारी गुरे, आमच्या फांद्यांवर आपले छोटेसे घरटेबांधणारे पक्षी, पारंब्यांना लटकून तुम्हाला वाकुल्यादाखवणारी माकडे, हे सगळं बघितलं कि आम्हाला खूपआनंद होतो. आमच्यामुळे आम्ही कोणालातरी सुखीकरतोय हि भावनाच मुळी अद्वितीय आहे. घराच्या बागेतअसणाऱ्या झाडांशी जेव्हा तुम्ही प्रेमाने गप्पा मारता तेव्हातीच झाडे त्या आनंदाच्या बदल्यात तुम्हाला स्वच्छ हवा, फळे, फुले भरभरून देतात. माणसाच्या तीनही मूलभूतगरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या झाडांच्याअस्तित्वानेच पूर्ण होतात.
आज माणूस हे सगळं विसरत चाललाय. आणि म्हणूनचआज मला बोलावं लागतंय. ज्ञानेश्वर, तुकाराम आदीसंतांच्या ओव्यांमध्ये अग्रस्थानी असलेले वृक्ष आजपत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणात कोलमडून पडतआहेत. आणि यामुळेच जगाचे चक्र बिघडले आहे. ऋतुचक्र बदलत चाललंय. वेळी अवेळी येणारा पाऊस, अचानक येणारी थंडीची लाट आणि वाढत चाललेलाउन्हाळा हे सर्व ऋतुबदल झाडांच्या होणाऱ्याकत्तलीमुळेच आहेत. २००५ साली आलेला महापूर, २००४ सालची त्सुनामी, नुकतेच चेन्नई ला धडकलेवादळ झाडे तोडीचाच एक छोटासा परिणाम आहे.
ऑक्सिजन चे घटत चाललेले प्रमाण, ओझोन चीकमतरता या सर्व गोष्टी जर आज आटोक्यात आणल्यानाहीत तर पुढे जाऊन सर्वच जीवसृष्टी धोक्यात येईल. नाहीशी होत जाणारी जंगले यामुळे आज प्राण्यांच्याअस्तित्वावरही परिणाम होत आहे. त्यांचा निवाराच तुम्हीमाणसांनी संपवून टाकला आहे. स्वतःच्या फायद्यासाठीमाणूस स्वतःचेच नुकसान करत आहे, हे तुमच्यालक्षातच येत नाहीये. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला कितुम्हाला पाणीटंचाई जाणवते. झाडेच नसतील तर पुरेसापाऊस कसा येणार? नुकतंच मी या बागेत कोणालातरीबोलताना ऐकलं कि केप टाऊन नावाच्या शहरातलासगळा पाणीसाठा संपलाय. ऐकून धक्काच बसलामला.
विकासात्मक कामासाठी रस्ते रुंद करणे अपरिहार्य आहे आणि ही कामे करताना आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले गेले आहेत, तोडले जात आहेत. शहरी भागात वटपूजनासाठी झाडाजवळ जाण्याऐवजी आजच्या कार्यमग्न महिला बाजारातून एखादी वडाची फांदी विकत घेतात आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे ! यामुळे असंख्य चांगल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी झालेली आपल्याला दिसते, यामुळे या अक्षय वृक्षाला आपण ग्रहण लावत आहोत. आधीच संख्येने कमी असलेले वटवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो, त्याची परतफेड आपल्याला करायला नको का?
हे जर असंच सुरु राहील तर एक दिवस सगळ्याजगातला पाणीसाठा संपेल, नद्या आटतील, पशु पक्षीमाणसे तुम्हा आम्हा सगळ्यांचाच अस्तित्व धोक्यातयेईल. आज तुमच्यातील काही जणांना याची जाणीवझाली आहे. झाडे लावा, झाडे जगवा हि मोहीम आजजोरात सुरु आहे. परंतु ज्या प्रमाणात तुम्ही झाडांचीकत्तल केली आहे त्या प्रमाणात झाडे लावली जातनाहीत. तेव्हा वेळीच सावध व्हा. मी काय आज आहे तरउद्या नाही असं मलाही आता वाटायला लागलं आहे. आणि म्हणूनच मी विचार केला कि जाण्यापूर्वीकोणाशीतरी बोलावं, मनातलं सगळं सांगून टाकावं. माणूस बुद्धिमान प्राणी समजला जातो मग तुमच्याबुद्धीचा योग्य तो वापर करा. निसर्गाला वाचवा तरचनिसर्ग तुम्हाला वाचवेल.”
एवढं बोलून ते झाड शांत झालं, आणि मी मात्र त्याचाचविचार करत बागेतून चालू लागलो. झाड खरं बोलत होतं. आजही ते माणसांचाच विचार करतंय हे ऐकून जीवसुखावला.