mee daptar boltoy atamvrutta in marathi
Answers
हाय मित्रा, मी बोलतोय !
अरे काय शोधतोय ?
अरे तुझ्या पाठीवर आहे मी!
हो बरोबर मी दप्तर बोलतोय!!
जेव्हा माझा भाऊ म्हणजेच तुझे जुने दप्तर जीर्ण झाले तेव्हा तुझ्या बाबांनी मला घरी आणले. मे बॅक तू स्कूल ह्या कारखान्यात तयार झालो आणि शाळेतल्या मुलांसाठी खास मला बनविण्यात आले. त्या नंतर मी तुझ्या घरी आलो आणि नंतर तुझ्या पाठीवर. आणि मग मी तुझा पाठलाग सोडलाच नाही.
तुम्ही मुले माझ्या मध्ये पुस्तकं, डबे, बॉटल, पेन्सिल बॉक्स इत्यादी भारतात आणि मला रोज शाळेत आणता. मी तुमच्या अंगाचा एक भाग झालो आहे. माझ्या अंगामध्ये जेव्हा तुम्ही सामान भरता तेव्हा मला खूप वजनदार वाटते आणि ते वजन मी तुमच्या पाठीवर टाकतो. ह्याचे मला कधी कधी वाईट वाटते पण नाईलाज आहे आपण काही करू नाही शकत त्या गोष्टीला!
तुझ्यासोबत शाळेत मी माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना भेटतो व मला ह्यात खूप आनंद मिळतो. माझा दिवस सुखाने जातो. जेव्हा घरी आल्यावर तू मला माझ्या जागेवर ठेवतोस तेव्हा मला झोप येते आणि मी आराम करतो. कसेही असुदे मला माझी दिनचर्या खूप आवडते.