Mera bharat mahan in marathi
Answers
Answer:
मेरा भारत महान
this is in marathi
Answer:
नमस्कार मित्रांनो आज आपण माझा भारत महान मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात.
माझा भारत महान निबंध मराठी | Maza Desh Nibandh In Marathi
खालील प्रमाणेविषय किंवा शीषर्क असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला आहे.
माझा आवडता देश भारत निबंध मराठी
भारत माझा जगी महान मराठी निबंध
भारत देश निबंध मराठीत
भारत माझा देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे. भारताचा इतिहास मोठा रोमांचक व स्फूर्तिदायक आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही भारतीयांची सर्वात मोठी ठेव आहे. हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा तिला लाभली आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या सार्या भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध आहेत, हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे, तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. विश्वविजयी तिरंगा असा आमचा राष्ट्रध्वज आहे. जनगणमन हे आमचे राष्ट्रगीत आहे. साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोकचक्र ही आमची अस्मिता आहे. अभिनंदन धर्माचे पंथाचे जातीचे कोट्यावधी लोक या देशात गुण्यागोविंदाने राहतात. विविध प्रांत धर्म जाती यांचा रीतिरिवाज आणि सांस्कृतिक अविष्कार आतही भिन्नता आहे. पण या विविधतेतही एकता आहे; कारण आम्ही सर्वजण भारतीय आहोत भारताचा भूगोल हा विविध अपूर्ण आहे. मोसमी वाऱ्यांची वरदान, हिमालयाची मायेची पाखर आणि गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी यासारख्या अनेक नद्यांची माया ममता यावर माझी मातृभूमी पोहोचलेली आहे. भारतावर निसर्गाचा तर वरदहस्त आहे. नैसर्गिक सुंदर याची एवढी विविधता जगात कुठेही आढळत नाही.
माझ्या भारत भूमीने अनेक नर रत्नांना जन्म दिला आहे. सम्राट अशोकाचे शांतीपर्व गौतम बुद्धाचा त्याग, महावीराची अजोड संन्यस्त वृत्ती, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा ही सर्व आमची स्फूर्तिस्थाने आहेत. दया, समा, शांती शिकवणाऱ्या संताचा आम्हाला भारताला लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग क्रांतिवीरांची तेजस्वी परंपरा आम्हाला लाभली आहे. महात्मा फुले डॉ आंबेडकर यासारखे दलितांचे कैवारी; लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस यासारखे नेते, महात्मा गांधी ,जवाहरलाल नेहरू यासारखे आधुनिक भारताचे शिल्पकार; गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर, सरोजनी नायडू, यासारखे प्रतिभावंत; स्वामी विवेकानंद, गाडगे महाराज यासारखे विचारवंत या सर्व महान विभूतींनी गौरवास्पद ठरलेला माझा भारत महानता आहे!
अशा या माझ्या भारतावर ज्यावेळी परकीय आक्रमण झाले, संकट आले मग ते नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो त्यावेळी आम्ही भारतीय एकत्र आलो आहोत आणि यशस्वीपणे त्या संकटाला सामोरे गेलो आहोत आधुनिक जगाचे भारताने आपले आगळे स्थान निर्माण केली आहे खेळापर्यंत भारताने स्वतःच्या कर्तबगारीवर आपले अढळ स्थान निर्माण केले आहे शेती उद्योगधंदे व्यापार विविध सेवा क्षेत्र शिक्षण संस्था अशा विविध क्षेत्रात स्वतःचे उच्च स्थान प्राप्त करून भारत स्वयंपूर्ण बनला आहेत शिवाय जगातील कमजोर देशांना आधार देण्याची क्षमताही मिळवली आहे. एक उगवती महासत्ता म्हणून जग भारताकडे पाहत आहे. म्हणून तर जागतिक प्रश्नांच्या वेळी जगाला भारताचे मत लक्षात घ्यावी लागते. त्यामुळे जगाच्या पाठीवर कोठेही वावरणाऱ्या भारतीयांच्या मनात एकच मंत्र गुंजत असतो तो म्हणजे माझा भारत महान
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो
वर्णनात्मक सण उत्सव
Next
माझा आवडता विषय मराठी निबंध | Essay On Marathi Language
Previous
कलावंत नसते तर मराठी निबंध | Kalavant Naste Tar Marathi Nibandh
२ टिप्पण्या:
Unknown
एक महान भारत घडविणयासाठी मी ही पाच गोष्टी करेन निबंध
उत्तर द्या
ADMIN
होय........ वरील निबंध वाचून नक्कीच तुमच्या विचारात बदल झाला प्रत्येकाने जर सुरवात केली तर हे सहज सध्या होईल
उत्तर द्या
निबंधाचे प्रकार
आत्मकथनात्मक कल्पनाप्रधान चरित्रात्मक मनोगत वर्णनात्मक वैचारिक सण उत्सव
Popular Posts
स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध | Majha Shalecha Pahila Divas Nibandh
माझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadta Khel In Marathi Nibandh
माझा आवडता प्राणी हत्ती मराठी निबंध | Maza Avadta Prani Marathi Nibandh
पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध |
शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध |
माझा आवडता ऋतू मराठी निबंध |
माझे आजोबा मराठी निबंध |
माझी आई निबंध मराठी निबंध |
जंगलचा राजा सिंह निबंध मराठी |
तुमचा काही अभिप्राय असेल किंवा कुठला विषय असेल अथवा काही तक्रार असेल ते सुद्धा आम्हाला जरूर सांगा आपल्या अभिप्रायाची आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्यक ते बदल सुधार घडवून आणू आमच्या संकेतस्थळाला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करिता महत्वपूर्ण आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि ब्लॉग विस्तार तसेच आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. आमचे संकेतस्थळ हे प्रत्येक वाचक आणि लेखक यांच्याकरिता एक खुले व्यासपीठ आहे.