India Languages, asked by Mridulp2077, 8 months ago

mi ek piklele pan essay in marathi

Answers

Answered by adityadesale60
0

Answer:

वाळलेली पानेबागेतल्या एका झाडाखाली एक पिकलेले पान गळून पडले. बघता बघता झाडावरची सर्व पाने गळून पडली. वाऱ्याची थोडी मोठी झुळूक आली आणि पानांनी फेर धरला.

admin | April 27, 2014 12:11 pm

NEXT

X

बागेतल्या एका झाडाखाली एक पिकलेले पान गळून पडले. बघता बघता झाडावरची सर्व पाने गळून पडली. वाऱ्याची थोडी मोठी झुळूक आली आणि पानांनी फेर धरला. वाळलेली पाने हुंदका देऊन रडू लागली. विदुलचं तिकडे लक्ष गेलं. तो झाडाजवळआला. तो वाळलेल्या पानांना म्हणाला, ‘तुम्ही का रडत आहात?’

 पाने म्हणाली, ‘आम्ही याच झाडावर जन्मलो तेव्हा आमची कोवळी तांबूस पालवी होती. आम्ही खूपच गोड दिसायचो. येणारे जाणारे सगळे आमची चैत्रपालवी कौतुकाने बघायचे. चैत्र संपला, वैशाख उजाडला, आम्ही थोडे मोठे झालो. शेंडय़ांचा पोपटी रंग मोहक दिसू लागला. ज्येष्ठ-आषाढात तर आम्ही चांगलेच मोठे झालो. या झाडावरच आम्ही जन्मलो, वाढलो, सळसळलो आणि आता वाळलेला पाचोळा होऊन खाली पडलो आहोत. आता आमचा काहीच उपयोग नाही.’

 त्यावर विदुल म्हणाला, ‘हा तर सृष्टीचा नियम आहे.’

‘अरे, ते आम्हालाही कळतंय. पण आता आम्हाला या झाडाखाली एकत्र राहायचं आहे. या झाडाखाली एकत्र बसून तो वैशाखात फुलणारा गुलमोहर, मोगऱ्याचा घमघमाट, श्रावणातला नाजूक पारिजातकाच्या फुलांचा पहाटे पडणारा सडा, थंडीत दरवळणारी रातराणी, पौषातला मोहोराचा सुगंध, माघातल्या अगदी छोटय़ा कैऱ्यांनी लगडलेला आंबा, आम्हाला हे आमच्या झाडाखाली एकत्र बसून बघायचं आहे. या आमच्या झाडावर अनेक पक्ष्यांचे संसार फुललेले आहेत. पक्ष्यांच्या गुलाबी पिल्लांची कोवळी किलबिल, पक्ष्यांचे पिलांना भरवणं, हे सारं आम्हाला बघायचं आहे. थंडीतली सकाळची सूर्याची वेल्हाळ किरणं, आश्विन महिन्यातले पौर्णिमेचे चांदणे. चंद्राच्या प्रकाशातील पानांची जाळीदार 

Similar questions