mi kelela upvas marathi nibandh
Answers
Explanation:
आपल्या नित्याच्या जीवनात निरनिराळ्या व्रतोत्सवांच्या निमित्याने निरनिराळे उपवास केले जातात. उपवास हे अनेकवेळा व्यक्तिगत पातळीवर आणि काहीवेळा सामजिक पातळीवरही केले जातात. उपवास हे एक साधे आणि सर्वसामान्याना करता येण्यासारखे व्रत आहे. उपवासचा सर्व् सामान्य अर्थ म्हणजे काही काळ अन्न , पाणी वर्ज्य करून राहणे होय. आरोग्याच्या दृष्टीने उपवास म्हणजे लंघन होय. उपवास हि धार्मिक आचरणातील एक शिस्त आहे. तन- मनाची शुद्धी आणि धार्मिक आचरण या दृष्टीकोनातून उपवास केला जातो. उपवास विचार फार प्राचीन काळापासून केला गेला आहे.
पापकर्मापासून निवृत्त झलेल्या माणसाचा सद्गुगुणांसह वास म्हणजे उपवास. यात सर्व भोग( खानपानदि) वर्ज्य करावयाचे असतात. सर्सामान्यपणे उपवासाचा अर्थ मित आहार घेणे असाच करतात. उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे. उपनिषद काळात जाणत्या लोकांना उपवासाचे महत्व ज्ञात होते. बृहद अरण्यात परमेश्वराजवळ जाण्याचे जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात उपवासाचाही निर्देश आहे. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप व उपवास हे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत असे शास्त्र सांगते. तपाच्या विविध प्रकारात उपवास हा मुख्य व श्रेष्ठ आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वात निरनिराळ्या प्रकारचे उपवास व त्यांची निरनिराळी फळे यांचे वर्णन केले आहे. या सर्व फळांचे तात्पर्य स्वर्गप्राप्ती हेच आहे. शास्त्राप्रमाणे नक्तभोजन, भात वगळून हविष्यान्न, फळे, तीळ, दूध, पाणी, तूप, पंचगव्य व वायू भक्षण करून केलेला उपवास प्रशस्त होय. उपवास काळात अंजन, गंध, पुष्प, माला अलंकार, तांबुल, दिवसा निद्रा, अति जलपान या गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत.
काही कारणाने व्रती मनुष्यास उपवास करणे शक्य नसेल तर त्याचा प्रतिनधि उपवास करू शकतो. पती, पत्नी एकमेकांचे व्रत घेऊ शकतात.
उपवास करण्याचा मुख्याविधी म्हणजे उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री भोजन करून नये. भोजन करणे आवश्यक असल्यास पहिल्या प्रहरात अल्प आहार घ्यावा व दुसर्या दिवशी पूर्ण उपवास करावा.