Mi maza mat vikanar nahi nibandh in marathi
Answers
Answer:
मित्रांनो आपण लोकशाही स्वीकारली आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य. आता लोक हेच राजे होत. लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्यांना राज्यकारभार करण्यासाठी पाठवतात. हे प्रतिनिधी निवडण्याचे कार्य मी करते. म्हणजेच लोकांचे राज्य निर्माण करण्याचे कार्य मी करते. यावरून माझे कार्य किती मोलाचे आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
सर्वसामान्य माणसांकडे त्यांचे स्वतःचे काही विचार असतात. काही कल्पना असतात. त्यांच्या इच्छा-आकांक्षा असतात. आपल्या राज्यात आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असे त्यांना वाटत असते. म्हणून जे प्रतिनिधी लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे वचन देतात, त्यांनाच लोक मत देतात. निवडून आल्यावर हे प्रतिनिधी लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना त्यांना तसे करावे लागते; नाहीतर लोक त्यांना पुन्हा निवडून देणारच नाहीत. यामुळे राज्यकारभारात आपोआपच लोकांच्या मनाचे प्रतिबिंब पडते; लोकांचा सहभाग निर्माण होतो. खऱ्या अर्थाने हे राज्य लोकांचे राज्य बनते. हीच खरी लोकशाही होय.
मित्रांनो, माझ्या कार्याचं महत्त्व इतकं मोठं असल्यामुळे निवडणुकीच्या दिवशीचा माझा रुबाब काही विचारू नका. त्या दिवशी मला परममंगल मानले जाते. माझी खास बडदास्त ठेवली जाते. शिपाई कर्मचाऱ्यापासून ते अत्यंत उच्च अधिकाऱ्यांपर्यंत आणि साध्या पोलिसापासून ते लष्करी अधिकाऱ्यापर्यंत सगळेच माझ्या दिमतीला असतात. सर्वजण अत्यंत नम्रपणे व आदबीने माझ्या आगेमागे वावरत असतात. मतमोजणीच्या दिवशी तर सर्वजण डोळ्यात प्राण आणून आतुरतेने माझ्याकडे पाहत असतात. कारण त्यांचे भवितव्य माझ्या पोटात सामावलेले असते !
परंतु मित्रांनो, अलीकडे काही अपप्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. काही गुंड प्रवृत्तीचे व भ्रष्टाचारी लोक लोकशाही पद्धतीचा दुरुपयोग करतात. ते समाजकंटकांना हाताशी धरून खोटे मतदान करण्याचा प्रयत्न करतात. दारू, पैसे वा कपडेलत्ते देऊन लोकांना फितवतात. काहीजण दमदाटी करून आपल्याला मतदान करायला सांगतात किंवा मतदानाच्या दिवशी दहशत निर्माण करून आपल्याला प्रतिकूल असलेले लोक मतदानासाठी बाहेर पडूच नयेत, असा प्रयत्न करतात. काहीजण तर मला पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. हे लोक म्हणजे लोकशाहीचे शत्रू त. हे लोक परकीय शāपेक्षाही घातक असतात. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी निवडणूक आयोगाने माझ्या स्वरूपात बदल केले आहेत. आता मी इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे रूप धारण केले आहे.
“मित्रांनो, अशा परिस्थितीत माझी तुम्हांला विनंती आहे. त्यासाठीच मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही थोड्याच वर्षांत मतदार व्हाल. लोकशाहीचे शत्रू तुमच्याकडे येतील. तुम्हांला जातधर्म, भाषाप्रांत यासंबंधांतील तुमच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील. दंगली करण्यासाठी तुम्हांला प्रोत्साहित करतील. आपणच तुमचे खरे नेते आहोत, असे भासवून तुमची मते मागतील. मित्रांनो, या शत्रूपासून सावध राहा. स्वतः विचार करा. उमेदवारांमध्ये गुंड कोण, भ्रष्टाचारी कोण, चांगला कोण हे सगळ्यांना माहीत असते. चांगल्या माणसालाच मते दया आणि देशाला वाचवा.”