Mi mumbaikar essay in marathi
Answers
मी आई मुंबईकर मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी पण आम्ही मुंबईकरांसाठी मुंबई म्हणजे आमचा जीव की प्राण
■■ मी मुंबईकर■■
नमसकर मंडळी!! मी एक मुंबईकर बोलत आहे. मला माझ्या शहरावर, माझ्या मुंबईवर खूप प्रेम आहे आणि मला मुंबईकर असण्याचा खूप गर्व आहे.
माझा जन्म मुंबईमध्येच झाला आणि मी माझ्या कुटुंबासोबत इथे कित्येक वर्षांपासून राहत आहे.
मी मुंबईकर असून, मला माझ्या शहराच्या संस्कृति, परंपरा आणि इकडच्या लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर गर्व आहे. आम्ही मुंबईकर एकमेकांच्या मदतीसाठी लगेच धावत जातो.
आम्ही मुंबईकर आमच्या शहरावर आलेल्या कोणत्याही संकटाला घाबरून न जाता, साहस करून त्या संकटाशी लढतो.
मी मुंबईकर असून मला माझ्या शहराच्या सुंदतरतेवर प्रेम आहे. मुंबईमधील खास पर्यटक स्थळ पाहायला लोकं देश विदेशावरून इथे येतात.
माझ्या शहराने प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आज इथे लोकं देशाच्या कानाकोपऱ्यातून आपले करियर घडवण्यासाठी येतात.
मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो, की माझा जन्म मुंबईत झाला असून मला एक मुंबईकर वहायची संधी मिळाली.