Mi pahileli aag. Essay in Marathi . Fast please
Answers
Answer:
एकदा मी माझ्या मामाकडे राहायला गेली होती. मी आणि माझी बहीण बेडरूम मध्ये टीव्ही पाहत होतो आणि माझा छोटा भाऊ दिवाणखान्यात खेळत होता.
अचानक, माझ्या छोट्या भावाने आमच्या खोलीचे दार ठोकायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही दार उघडले, तेव्हा तो म्हणाला, मला दिवाणखान्यात धूर दिसतोय. दिवाणखान्यात गेल्यावर,बघतो काय, सगळीकडे धूरच धूर!
तिथे इतका धूर झालेला की आम्हाला एकमेकांचे चेहरे देखील दिसत नव्हते. काही मिनिटांतच सोफाही आग पकडू लागला. हळूहळू आग वाढू लागली.आम्ही काय करावे हे सूचत नव्हते.आम्ही शेजाऱ्यांकडे धावत गेलो आणि त्यांना बोलवले. ते आले, सरळ स्वयंपाकघरात गेले, पाण्याने बादल्या भरुन घेतल्या आणि त्यांनी आगीवर पाणी टाकले.आग विझायला लागली, पण धूर अजूनही होता.आम्ही ताबडतोब संपूर्ण घराच्या खिडक्या उघडल्या. काही वेळानंतर, परिस्थिती नियंत्रणात आली.
माझा मामा नेहमी सोफ्याजवळ असलेल्या देवाच्या मूर्तीजवळ अगरबत्ती पेटवतो. त्या दिवशी नकळत कदाचित सोफ्यावर थोडी राख पडली असावी आणि हा सगळा प्रकार झाला असावा! आम्ही देवाचे आभार मानले की कुठल्याही प्रकारची जीवहानी झाली नाही आणि थोडक्यात निभावलं.
Explanation:
Answer:
मी पाहिलेली आग - Mi Pahileli Aag - The Fire I Saw Essay In Marathi.
मला अजून ही आठवतोय तो दिवस. होय, ती रविवारची रात्रच होती. माझी आई, बाबा, ताई आणि मी आम्ही सर्व मिळून त्या दिवशी बाहेर सुपरमार्केट मध्ये खरेदी करून घरी येतच होतो इतक्यात आमच्या घराशेजारील एका मोठ्या बिल्डिंगच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर भली मोठी आग लागली असल्याचे आम्ही पाहिले.
त्या आग लागलेल्या बिल्डिंगच्या भोवती असंख्य लोकांची गर्दी जमा झाली होती. प्रचंड गोंधळ सुरु होता. अंधार असल्यामुळे काही समजतच नव्हते काय सुरु आहे. फक्त खूप आवाज, किकाळ्या आणि घाबरलेल्या लोकांचे आवाज येत होते.
परिसरातील नागरिक ज्याला जसे जमेल तसे मदतीसाठी धावपळ करीत होते. त्या बिल्डिंगच्या इतर मजल्यावरील लोकांना पटापट बाहेर काढण्याचा प्रयत्न इतर लोक करीत होते.
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी www.sopenibandh.com
Explanation:
www.sopenibandh.com