Mi sainik boltoy essay in Marathi
Answers
Explanation:
सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी लढणे हेच त्याचे भागधेय असते. परंतु, आपल्याच राष्ट्राचे लोक युद्धाच्या वेळी आपल्याच सैनिकांच्या घरातील लोकांवर अत्याचार करीत असतील तर अशावेळी ज्याचे ते घर आहे, त्या सैनिकाने काय करावे? तो सैन्यातूनच पळ काढतो, अशा आशयाचे कथानक असलेले आधारशिला नाटक शुक्रवारी सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे आयोजित ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू आहे. यात बॉश फाईन आर्टसच्या वतीने आधारशिला हे नाटक सादर करण्यात आले. मुकंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन बाळ मुजुमदार यांनी केले होते.
जगातील एका छोट्याशा खेड्यात ही घटना घडते. हे गाव जगाच्या नकाशावर शोधायचे झाले तर भिंग लावून शोधावे लागेल, अशी त्याची अवस्था. परंतु, तेथे सुख-शांतता नांदत असते. वर्षभरातून एखादाजण मरण पावत असे. त्यामुळे तितकेच काय ते दु:ख असे. मात्र, या गावाकडे शेजारील देशाच्या सैनिकांची वक्रदृष्टी पडते आणि गावातील बायका, पोरे, म्हातारी माणसे यांना नाडले जाते. बायकांवर अत्याचार केले जातात. सगळीकडे प्रेतांचा खच पडतो. अशावेळी गावात विध्वंस झालेला असताना, त्याच शत्रुराष्ट्राचा एक सैनिक या गावात येतो. आपल्याच सैनिकांकडून तो पोळलेला आहे. जीव वाचविण्यासाठी तो गावात येतो आणि गावचाच होऊन जातो. त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसतो तो गावाचा आधार बनतो; परंतु एक दिवस त्याचे सैनिक त्याला शोधत येतात आणि कोर्ट मार्शलसाठी त्याला घेऊन जातात, गाव पुन्हा एकदा निराधार बनते,
Please see attachment
Explanation:
hope it helps